व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Tuesday, 1 October 2024

शौर्य दिनानिमित्तजिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे कार्यक्रम साजरा

 


नांदेड दि. 1 ऑक्टोबर : शौर्य दिवस 29 सप्टेंबर हा दिवस जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधुन प्रशासनातर्फे जिल्ह्यातील विरनारी, वीरपिता, विरमाता व माजी सैनिकांचा सत्कार निवासी उपजिल्हाधिकारी तथा सैनिक कल्याणअधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यातआला.


जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे आयेजित याकार्यक्रमात सुरुवातीला प्रास्ताविक मध्ये ऑ. कॅप्टन विठ्ठल कदम (निवृत्त), कल्याण संघटक नांदेड यांनी शौर्यदिनाचे महत्त्व सांगत भारतीय सैन्य दलाने 29 सप्टेंबर 2016रोजी पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे उग्रवादी कॅम्पस उद्धवस्त केले वअतिरेक्याचा खात्मा केला होता. ही कार्यवाही जम्मूकश्मीर उरी येथे झालेल्या अतिरेक्याचा भ्याड हल्ल्याचा बदलाघेण्यासाठी करण्यात आली होती. या दिनानिमित्त सर्व माजी सैनिकांना निवासी उपजिल्हाधिकारीतथा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकरयांनी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी सैनिकांचे जीवनखडतर असल्याचे सांगितले. माजी सैनिकांच्याअडीअडचणी सोडविण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असल्याचे सांगितले.

सार्जेंट रामरावथडके (निवृत्त), ऑ प्रकाश कॅप्टन कस्तुरे (निवृत्त), सुभेदार अर्जुन जाधव (निवृत्त), वसतिगृह अधीक्षक नांदेड,सुभेदार बालाजी भोरगे तसेच विविध ऑपरेशनमध्ये सहभागी झालेलेमाजी सैनिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर पाटील डूमने, संजय जाधव,प्रकाश कस्तुरे, अनिल देवज्ञे, सुर्यकांत कदम यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment