नांदेड दक्षिण मतदार संघासाठी फारूक अहमद तर लोहा कंधार मतदार संघासाठी शिवान रंगले यांच्या नावाची घोषणा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग आला आहे. वंचित बहुजन आघाडीने पहिल्या ११ उमेदवारांची घोषणा केली आहे. या यात नांदेड दक्षिण मतदारसंघातून फारूक अहमद आणि लोहा कंधार मधून शिवा नरंगले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.उमेदवारी घोषित झाल्यानंतर फारूक अहमद यांनी दर्गाह हजरत दुलहशहरहेमन येथे भेट दिली तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे असंख्य कार्यकर्ते आणि समर्थकांनी फारूक अहमद यांना शुभेच्छा दिल्या
विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली असताना वंचित वहुजन आघाडीने पहिल्या टप्प्यात राज्यातल्या ११ उमेदवारांची यादी जाहीर करून वाजी मारली आहे. वात नांदेड जिल्ह्यातील दोन उमेदवारांचा समावेश आहे. वंचित वहुजन आघाडीचे नदिड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून डॉ. फारुख अहमद आणि लोहा - कंधार विधानसभा मतदारसंघातून शिवा नरंगले याना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. वाळासाहेव आंबेडकर यांनी आज ही घोषणा केली. राज्यातील एकूण अकरा विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात लोहा व नांदेड दक्षिणमधून दोन उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
दरम्यान वहुतांश पक्ष चाचपणीत व्यस्त असताना पहिल्या टप्प्यात उमेदवार जाहीर करण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने वाजी मारली आहे. त्यामुळे अन्य पक्षांतील हालचालींना वेग आला आहे.
ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागा वाटपांचा तिढा सोडवला जात आहे. दुसरीकडे तिसरी आघाडीही राज्यात उमेदवार देणार आहे. याबाबतही बैठकांचे सत्र सुरूच आहे. या सर्व राजकीय घडामोडी होत असताना वंचित बहुजन आघाडीने मात्र राजकीय आघाडी घेत विधानसभेसाठी राज्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात फारूक अहमद आणि कंधार लोहा लोहा कंधार विधानसभा मतदारसंघात शिवा नरंगले यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आतापासून हे दोन्ही उमेदवार प्रचाराला लागणार आहेत. हे दोन्ही उमेदवारांनी २०१९ ची विधानसभाही याच मतदारसंघातून लढवली होती. पुन्हा एकदा या दोन्ही उमेदवारांना वंचित ने संधी दिली आहे.
राज्यातील रावेर, सिंदखेडराजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर,
नांदेड दक्षिण लोहा, औरंगाबाद पूर्व, शेगाव आणि खानापूर या
मतदारसंघाचे उमेदवार घोषित केले आहेत.
No comments:
Post a Comment