इस्लाम धर्माचे प्रेषीत मोहम्मद पैंगबर यांच्या वाढदिवसा निम्मीत 16 सप्टेंबर रोजी ईद मिलादूनबी रॅली पोलीस प्रशासनाकडून रद्द करत रॅली दि 19 सप्टेंबर रोजी काढण्याची सूचना केली आज दि 19 सप्टेंबर रोजी गुरुवारी रेल्वे स्टेशन भागातील न्याहळी रोड वरील बिलाल मेकॅनिक यांच्या घरापासून आणि मिल्लत नगर येथील खाजा गरीब नवाज मस्जीद येथून ईद मिलादूनबी संयुक्त रॅली काढण्यात आली बिलाल मेकॅनिक यांच्या येथे सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचा कार्यकर्त्यांचा,पत्रकारांचा ईदए मिल्लादुनबी कॅमीटीच्या वतीने हार आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.
आज सकाळी 10 वाजता ईद मिलादूनबी रॅली शहरातील रेल्वे स्टेशन येथून निघत नगर परिषद समोरून ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या समोरून ,शिवाजी नगर , उमरी चौक, ईदगाह मैदाना समोरून , महात्मा बसवेश्वर चौक होत गुजरी इस्लामपूरा येथील मस्जीद या ठिकाणी ठीक 1.30 वाजता पहूचली
या वेळी शहरातील पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वसंत सप्रे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक बाबासाहेब कांबळे, बारड पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष केदासे , पोलीस उपनिरिक्षक शिवाजी पाटील शिंदे , पोलीस उपनिरिक्षक बंडू गवई , पोलीस जमादार किशोर पाटील, चंद्रशेखर मुंडे, बलवीर सिघ ठाकूर ,एन बी रघुवंशी, डी.जी.चक्रधर, इरलेवाड ,पांचाळ, जाधव , झूंजारे, शेख समदानी , शेख मकसूद सह होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

No comments:
Post a Comment