व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 13 September 2024

नांदेड उत्तर विधानसभेसाठी रऊफ जमीनदार यांची राष्ट्रवादीकडून दावेदारी.



 नांदेड - 
    आगामी विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी पक्षाच्या युवक आघाडीचे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी पक्षश्रेष्ठीला केली आहे.
 महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्यावतिने मतदारसंघनिहाय ईच्छूकांकडून अर्ज मागणी सुरु असल्याने पक्षाच्या युवक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांनी आपला मागणी अर्ज पक्षश्रेष्ठीला दिला आहे.
   राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्याकडून पुरोगामी विचारांचा वारसा जोपासला जात असल्यानेच  पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आ.जयंत पाटील व युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्याशी समन्वय साधून पक्षाचे स्थानिक जेष्ठ नेते व माजी मंत्री कमलकिशोर कदम यांचे खंदे समर्थक म्हणून सुपरिचित असलेले रऊफ जमीनदार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षात नांदेड शहर जिल्हा उपाध्यक्ष, संघटक व प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदी विविध पदांची यशस्वीपणे धुरा सांभाळल्यानंतर सद्या पक्षाच्या युवक आघाडीचेच शहर जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.पक्षाच्या विचारधारेशी युवकांना जोडण्यात त्यांचा मोठा हातखंडा असून महामानवांचे विचारांचा प्रचार व प्रसारासाठी ते सदैव कर्तव्यतत्पर असतात. त्यांनी नांदेड विमानतळ विस्तारिकरणाच्या जमीन,घर बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून सतत ९ वर्षे लढा दिला व  कामठा,गाडेगांव,म्हाळजा येथिल शेतकऱ्यांच्या जमीन आरक्षणाबाबतच्या  आंदोलनातही अग्रक्रमी राहून पिडीतांना न्याय मिळवून दिला. तसेच,मेमोरियल दवाखाना निर्मितीसाठीही पुढाकार घेतला. कोरोना महामारीच्या काळात गोरगरीब जनतेसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना स्वखर्चातून अन्नधान्य व उपचारालाही मदत केली. युवकांच्या कल्याणासाठी ते सातत्यपूर्णपणे विविध उपक्रम राबवित असतात. समाजकारणातून राजकीय वाटचालीला त्यांचे प्राधान्य असते.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून महाविकास आघाडी प्रणित काॅग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव पाटील चव्हाण यांच्या विजयात योगदान देत त्यांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून शहरी व ग्रामीण भागात मोठे मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाचे मोठे प्राबल्य असून समाजातील युवा नेतृत्व म्हणून ते सुपरिचित आहेत.राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी व या भागातील सर्व समाजघटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असून
त्यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केल्याने ते या मतदारसंघात प्रबळ दावेदार ठरु शकतात.तसेच,जमीनदार यांना संधी दिल्यास आगामी विधानसभा निवडणूकीत या ठिकाणी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाला नक्कीच विजयाची संधी राहील असा येथिल मतदार व जनतेसह स्थानिक विश्लेषकांचा सूर आहे.

No comments:

Post a Comment