संभाजीनगर : महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या युवक संघटनेच्या वतीने आज ता. 09 फेब्रुवारी शहरातील क्रांति चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र अभिषेक घोसाळकर यांची दहिसर येथे पाच गोळ्या झाडून झालेल्या हत्या प्रकरणी रोष व्यक्त केला. संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी करत जोरजोरात घोषणाबाजी करून राज्य सरकारचा निषेध केला.
याप्रसंगी युवासेना सहसचिव धर्मराज दानवे,जिल्हाधिकारी हनुमान शिंदे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष वरुण पाथ्रीकर, विश्वास औताडे, प्रशांत जगताप, सुशील बोरडे, दीक्षा पवार, सानिका देवराज, धनश्री तळवलकर, संदीप लिंगायत,अतुल बीडकर, अजय चोपडे, सागर खरगे, रामेश्वर कोरडे, सागर वाकचौरे, यश पागोरे, अमर जगताप, ऋषिकेश तोरणमाळ, प्रशांत पूरे, साईनाथ घुगे, शौकत पटेल, आनंद मगर, सोनू अहिरे, अभिजीत थोरात,देवीदास रत्नपारखे, हेमंत दांडगे, किरण गायकवाड, दिपाली पाटील, मोहित श्रीवास्तव, शुभम साळवे, विशाल सानप व मोठ्या संख्येने महाविकास आघाडी पदाधिकारी उपस्थित होते..
महाराष्ट्र व संभाजीनगरात राज्य शासनाच्या भ्रष्ट कार्यभारा विरोधात रस्त्यावर आलो तर शिंदे गट व भाजपाचे गुंडे राडा करण्यास आमच्यासमोर येतात.शासनाची हुकुमशाही पद्धतीने दडपशाही सुरू असून लोकशाही मार्गाने आंदोलनही ते करू देत नाहिये. लोकशाही मार्गाने आंदोलन करत असलो तरीही पोलिसांनी महाविकास आघाडीच्या युवक कार्यकर्त्यांना जेरबंद केले. पोलिसांची ही आमच्या विरोधात जुलमशाही सुरू असल्याची प्रतिक्रिया युवासेना सहसचिव धर्मराज दानवे यांनी यावेळी दिली.
अभिषेक घोसाळकर यांची गुंड मॉरिस कडून झालेल्या हत्येचा तसेच मागील काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या गोळीबाराच्या घटनाचा निषेध व्यक्त करावा
म्हणुन महाविकास आघाडीच्या युवक पदाधिकारी यांनी आंदोलन आयोजित केले होते. त्याचप्रासंगी भारतीय जनता पक्षाच्या वतीने राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ओबीसी बाबतच्या कथित वक्तव्य प्रकरणी आंदोलन सुरू होते, यावेळी दोन्ही गट एकमेकांसमोर एकत्र येत तुफान राडा झाला.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शांततेत आंदोलन करत असलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यासमोर येऊन मोठ मोठ्याने घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर जोरदारपणे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी यांना प्रत्युत्तर दिले.काही मिनिटांच्या प्रयत्नांनंतर पोलिसाना हा गोंधळ निवळण्यास यश आले.

No comments:
Post a Comment