व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Tuesday, 6 February 2024

विकासाची गॅरंटी मोदी सरकार;अब की बार 400 पार! बोधन-बिदर व नांदेड-लोहा-लातूरसह बोधन-मुखेड-लातूर नव्या रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्व्हेक्षणास मंजूरी-खा.चिखलीकर

 



नांदेड/प्रतिनिधी-काँग्रेस राजवटीच्या कार्यकाळातील गेल्या तीस ते पसत्तीस वषार्र्पासून प्रलंबीत असलेल्या नव्या रेल्वे मार्गाचा प्रलंबीत प्रश्‍न अवघ्या पाच वर्षाच्या भाजपा खासदाराच्या कार्यकाळात देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकाली काढला आहे. मोदी है तो मुनकीन है याचा प्रत्यक्ष अनुभव नांदेड जिल्ह्यातील जनतेला आला आहे. नांदेडच्या जनतेने भाजपा खासदाराला निवडून दिल्यामुळेच रेल्वेचे मोठे चार प्रकल्प मंजूर होवू शकले. मोदी सरकार विकासाच्या गॅरंटीवर जिल्ह्यातील जनतेने शिक्का मोर्तब करण्याचे मत बनवून अब की बार 400 पार मोदी सरकार बनविण्याचा निश्‍चय केला असल्याचा दावा नांदेड जिल्ह्याचे भाजपा खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी एका प्रसिध्दीपत्रकाव्दारे केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील नव्या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी प्रयत्न करुन काँग्रेसचे खासदार वयोवृध्द झाले तरी त्यांच्या कार्यकाळात कांहीही होवू शकले नाही. गेल्या लोकसभेच्या निवडणूकीत नांदेड जिल्ह्यातील मतदारांनी ऐतिहासीक निर्णय घेवून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव करुन भाजपाच्या खासदाराला निवडून दिल्यामुळेच नांदेड जिल्ह्यातील रेल्वेचे मोठे चार प्रकल्प मोदी सरकारने मंजूर करुन विकास कामातून नांदेडच्या जनतेला भरभरुन परतफेड केली आहे.

केंद्रात व राज्यात गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती. नांदेडचा खासदारही काँग्रेसचाच होता तरीही गेल्या तीस ते पसत्तीस वषार्र्च्या कायर्यकाळात एकाही नव्या रेल्वे मार्गास मंजूरी मिळू शकली नाही. सन 2019 च्या लोकसभा निवडणूकीत मतदारांनी भाजपाचा खासदार निवडून दिल्यानंतर रेल्वेच्या चार मोठ्या प्रकल्प व नॅशनल हायवेच्या रस्त्यासह जिल्ह्याच्या विकासाचा कायापालट करुन दाखविण्याची दाणत केवळ मोदी सरकारमध्येच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या पाच वषार्र्च्या आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात रेल्वेचे प्रलंबीत असलेले विकासाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी संसदेत बुलंद आवाज उठविला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री अश्‍विनी वैष्णव यांच्याकडे सतत पाठपुरावा करुन नांदेड-बीदर या नव्या रेल्वे मार्गाची मंजूरी प्राप्त करुन राज्य शासनाकडून 750 कोटी रुपयांचे बजेट मंजूर करुन घेतले. महाराष्ट्र भाजपाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नांदेड जिल्ह्यातील रेल्वेचे चार मोठे प्रकल्प मंजूर करुन घेण्यासाठी केंद्रात सतत प्रयत्न केले असल्याची माहिती खा.चिखलीकर यांनी व्यक्त केली आहे.

खासदार या नात्याने गेल्या महिन्यातच बोधन-बीदर, नांदेड-लोहा-लातूर, बोधन-मुखेड-लातूर या नव्या तीन रेल्वे मार्गास मंजूरी देण्याची विनंती करण्यासाठी जिल्ह्यातील रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांचे शिष्टमंडळ घेवून रेल्वे मंत्र्यांना भेटलो. या शिष्टमंडळात माजी खा.डॉ. व्यंकटेश काब्दे, रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारी संपादक शंतनु डोईफोडो, उद्योजक व रेल्वे प्रश्‍नाचे अभ्यासक हर्षद शहा आदिंची या शिष्टमंडळात समावेश होता. रेल्वेच्या प्रश्‍नासाठी संघर्ष करणारे ज्येष्ठ संपादक सुधाकरराव डोईफोडे हे आज हयात नाहीत पण त्यांच्या पश्‍चात त्यांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे खा. चिखलीकर यांनी सांगितले.

रेल्वेच्या प्रलंबीत प्रश्‍नाची सोडवणूक करण्यासाठी खासदार या नात्याने दिल्ली दरबारी सतत पाठपुरावा केल्यामुळे संसदेच्या चालू अधिवेशनात माझ्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन रेल्वे मंत्र्यांनी बोधन-बीदर, नांदेड-लोहा-लातूर, बोधन-मुखेड-लातूर या तीन नव्या रेल्वे मार्गाचे अंतिम सर्व्हे करण्याचे आदेश दिले आहेत. रेल्वे मंत्र्यांच्या आदेशानुसार रेल्वे बोर्डाचे सहाय्यक संचालक अभिषक जगावत यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजरला दि. 6 फेब्रुवारी 2024 रोजी पत्र पाठवून या तिन्ही नव्या रेल्वे मार्गाचे अंतिम (फायनल) सर्व्हे करण्याचे आदेश जारी केले आहेत.

बोधन-बीदर या 114 कि.मी.नव्या रेल्वे मार्गासाठी 285.25 कोटी रुपये तर नांदेड-लोहा-लातूर या 103 कि.मी.नव्या रेल्वे मार्गासाठी 295.75 कोटी रुपयांचा निधीही रेल्वे बोर्डाने या रेल्वे प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले असल्याचे आपल्या पत्रात नमूद केले आहे. गेल्या अनेक वषार्र्च्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यातील रेल्वे मार्गाचे जाळे निर्माण करण्यात भाजपाचे खासदार या नात्याने आपल्याला यश मिळाले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करुन हे नवीन रेल्वे मार्ग मंजूर केल्याबद्दल खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment