व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 8 February 2024

एडवोकेट दिलीप ठाकूर यांचा स्तुत्य उपक्रम कायापालट मागील 40 महिन्यापासून सुरू



*माझ्या बहात्तर वर्षाच्या आयुष्यात धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर घेत असलेल्या कायापालट सारखा उपक्रम पाहिला नसून संपूर्ण भारतात अशा प्रकारचा एकमेव उपक्रम असल्याचे प्रतिपादन माजी महापौर प्रकाश मुथा यांनी केले.४० व्या महिन्यात ४३ भ्रमिष्ट व्यक्तींची  कटिंग दाढी केल्यानंतर गरम पाण्याने स्नान घालून नवीन कपडे,शंभर रुपये बक्षिसी, चहा फराळ,आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार करण्यात आले.*
भाजपा ,लायन्स क्लब नांदेड सेंट्रल ,अमरनाथ यात्री संघ, सन्मित्र फाउंडेशन यांच्यावतीने खा.चिखलीकर, भाजप महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, लायन्सचे योगेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कायापालट उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी राबविण्यात येतो.नांदेड शहरातील विविध भागातून वेडसर, निराधार,बेघर,अपंग, कचरा वेचणारे यांना सुरेश शर्मा, अरुणकुमार काबरा,महेश शिंदे,संजयकुमार गायकवाड यांनी सिद्धेश्वर मंदिर परिसर, गोवर्धनघाट नांदेड येथे आणले. डोक्यावरील केस व दाढी वाढलेल्या या सर्वांची स्वंयसेवक बालाजी खोडके यांनी काळजीपूर्वक कटिंग दाढी केली. त्यानंतर सर्वांना गरम पाण्याने येथेच्छ  आंघोळ घालण्यात आली .स्वच्छ व मुबलक गरम पाण्याची व्यवस्था भाजपा कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांच्यातर्फे करण्यात आली होती. 

त्यानंतर सर्वांना नवीन पँट ,शर्ट, अंडर पँट, बनियन व शंभर रुपये  बक्षीसी देण्यात आली. सर्वांना  चहाफराळ वाटप करण्यात आला. चार तास सुरु असलेल्या कार्यक्रमानंतर सिद्धेश्वर बाबा शिवमंदिरचा परिसर ॲड.चिरंजीलाल दागडिया यांनी झाडून स्वच्छ केला.डॉ.दि.बा.जोशी यांनी  सर्वांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधोपचार केले. यावेळी प्रकाश मुथा, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य व्यंकट मोकले, ओमप्रकाश तापडिया, राजेश डुलगच पैठण, प्रा .कोनापुरे, सदाशिव कंधारे, मोहन लांडगे यांनी उपक्रमाला भेट देऊन कौतुक केले. आधीचा अवतार आणि कायापालट झाल्यानंतर मिळालेले रूप पाहून अनेक लाभार्थी  गहिवरून गेले.यापुढे असहाय्य दिसणारे, कचरा वेचणारे, वेडे भिकारी, अपंग व्यक्ती आढळल्यास नांदेड शहरातील नागरिकांनी मार्च महिन्याच्या पहिल्या सोमवारी भाजप अथवा लायन्स सदस्यास माहिती द्यावी असे आवाहन भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी केले. 

No comments:

Post a Comment