आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील तब्बल ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी महायुतीच्या दणदणीत बैठका झाल्या. आज ठाण्यामध्येही पहिल्यांदाच महायुतीची अतिशय भव्य बैठक आणि जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा पार पडला. या बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्यांना सज्ज व्हायचे आहे. आपल्याला केवळ लोकसभा निवडणूक महत्त्वाची नाही तर या देशाचे नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब करत असून त्यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. यामुळे आपल्याला २०१४, २०१९ हून जास्त जागा २०२४ च्या निवडणुकीत निवडून आणण्याचा निर्धार बोलून दाखवला. यंदा ‘जय श्रीराम’ सोबतचा आपला नारा ‘अब की बार ४०० पार’ हा असणार आहे, असे मत यावेळी व्यक्त केले. प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आयोजित राम मंदिर देखील उभे राहिले आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचेही यावेळी नमूद केले. पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना.श्री. अजितदादा पवार हे काम करत असून राज्य विकासाच्या वाटेवर नेत आहेत. आपल्या एमएमआर क्षेत्रामध्येही पायाभूत सुविधांची कामे असो, किंवा रेल्वेची कामे, यापूर्वी कधीही मिळाला नव्हता इतका निधी विकास कामांसाठी मिळाल्यामुळे एमएमआर मधील सर्व मतदारसंघांचे रूप पालटत असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. येणाऱ्या काळात महायुतीचे सर्व उमेदवार निवडून यायला हवेत, यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करायला हवे असे आवाहन यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले.
यावेळी केंद्रीयमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, महायुतीतील घटक पक्षाचे स्थानिक आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, महिला आघाडी, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment