व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Tuesday, 30 January 2024

नानक साई च्या घुमान साहित्य सभेचे संत नामदेव साहित्य पुरस्कार जाहीर..

नानक साई च्या घुमान साहित्य सभेचे संत नामदेव साहित्य पुरस्कार जाहीर..  
@ डॉ सदानंद मोरे,प्रा.फ.मु.शिंदे,निर्मलकुमार सूर्यवंशी,दत्ता डांगे,मनोज बोरगावकर,डॉ हंजराज वैद्य,व्यंकटेश चौधरी,शिवा कांबळे यांचा समावेश 
@ ४ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे संत नामदेव साहित्य संमेलनात होणार वितरण.. 

नांदेड  ३० जानेवारी- येथील नानक साई फाऊंडेशनच्या घुमान साहित्य सभेचे संत नामदेव साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. डॉ सदानंद मोरे, प्रा.फ.मु.शिंदे,निर्मलकुमार सूर्यवंशी,दत्ता डांगे,मनोज बोरगावकर,डॉ हंजराज वैद्य,देविदास फुलारी,डॉ भगवंत क्षीरसागर , शिवा कांबळे,व्यंकटेश चौधरी यांचा पुरस्कारात समावेश आहे. 
नानक साई फाऊंडेशनच्या वतीने तारीख ४ फेब्रुवारी रोजी नांदेड येथे होणाऱ्या संत नामदेव मराठी साहित्य संमेलनात या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती घुमान साहित्य सभेचे अध्यक्ष प्रा डॉ गजानन देवकर यांनी दिली. सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात अग्रगण्य ठरलेल्या नांदेड येथील नानक साई फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ साहित्यिक डॉ जगदीश कदम आणि नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांच्या पुढाकाराखाली हे संमेलन श्री गुरु ग्रंथ साहिब भवन (नांदेड) येथे आयोजित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ साहित्यिक डॉ संदानंद मोरे (पुणे),प्रा.फ.मु.शिंदे (छत्रपती संभाजीनगर),डॉ हंसराज वैद्य नांदेड, देविदास फुलारी,शिवा कांबळे,मनोज बोरगावकर (नांदेड),डॉ संजय बालाघाटे (पालम),डॉ. माधव जाधव (बाळापूर),डॉ. वामन निबांजी साळवे (कोल्हापूर),दिलीप गणपत आसबे (संभाजीनगर),डॉ चंद्रकांत वाघमारे बेळगाव ( कर्नाटक), निर्मलकुमार सूर्यवंशी ,दत्ता डांगे, चंद्रकांत शहासने पुणे,डॉ. व्यंकटी पावडे,डॉ भगवंत क्षीरसागर (नांदेड),व्यंकटेश चौधरी,श्रीहरी वेदपाठक,धोंडीबा गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड,स सो खंडाळकर,धोंडीबा गायकवाड,सुदर्शन रापतवार अंबाजोगाई,शिवाजी कऱ्हाळे हिंगोली,डॉ मचीन्दरनाथ नागरे यांना नानक साई च्या घुमान साहित्य सभेचे संत नामदेव साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत असे घुमान साहित्य सभेचे अध्यक्ष प्रा डॉ गजानन देवकर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment