व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 12 January 2024

आज पारंपारिक लोककला महोत्सव बक्षीस वितरण व समारोप


 श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा, मीडिया सेंटर ,13-   महाराष्ट्राच्या लोककलेचे जतन करण्यासाठी तसेच लोक कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदच्या वतीने दरवर्षी माळेगाव यात्रेत पारंपरिक लोक कलामहोत्सव घेण्यात येतो. आज रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी पारंपारिक लोककला महोत्सव व पशुसंवर्धनाचे बक्षीस वितरण तसेच यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे. 
    आज सकाळी 11 वाजता पारंपारिक लोककला महोत्सव होणार आहे. खासदार सुधाकरराव शृंगारे यांच्या हस्ते पारंपारिक लोककला महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
     प्रमुख उपस्थितांमध्ये आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार शामसुंदर शिंदे पाटील, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, नरेगाचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक अमित राठोड, जिल्हा समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार व माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
      सायंकाळी 4 वाजता पशुसंवर्धनाचे बक्षीस वितरण व कार्यक्रमांचा समारोप करण्यात येणार आहे. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल व पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या शुभहस्ते पशुसंवर्धनाचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. यावेळी अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. 
     प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा माळेगाव यात्रा सचिव मंजुषा जाधव-कापसे, कार्यकारी अभियंता ए. जी. गंगथडे, कार्यकारी अभियंता पी. एम. रायभोगे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, लोहा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डी.के. आडेराघो, देगलूरचे गटविकास अधिकारी एस.यु. देशमुख, कंधारचे गट विकास अधिकारी महेश पाटील, मुखेडचे गट विकास अधिकारी सी. एल. रामोड, मुदखेडचे गट विकास अधिकारी एस. एच. बळदे, माहूरचे गट विकास अधिकारी एस.जी. कांबळे नायगावचे गट विकास अधिकारी एल.आर. वाजे, उमरीचे गट विकास अधिकारी एम.डी. जाधव हादगावचे गट विकास अधिकारी के. व्ही. बळवंत, नांदेडचे गट विकास अधिकारी पी.के. नारवटकर, किनवटचे गटविकास अधिकारी अमित राठोड, बिलोलीचे गट विकास अधिकारी एस. एच. पद्मावार हिमायतनगरचे गट विकास अधिकारी एस. एम. मांजरमकर, भोकरचे गट विकास अधिकारी एस. एन. केंद्रे, धर्माबादचे गट विकास अधिकारी ए.एस. सूर्यवंशी व अर्धापूरचे गट विकास अधिकारी डी. एस. कदम यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.

No comments:

Post a Comment