प्रतिनिधी | नांदेड जिल्ह्यात १९ ग्रामपंचायती आणि २५ जागेवरील पोटनिवडणुकीचे निकाल सोमवारी (ता. सहा) जाहीर झाले. त्यात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार काँग्रेस आणि भाजपाला संमिश्र यश मिळाले आहे. तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांचा विजय झाला आहे. देगलूर तालुक्यात गोगला गोविंद तांडा येथे तेलंगणातील बीआरएस पक्षाने ताबा मिळवला. तसेच अद्याप कोणत्याच पक्षाने आपल्याला किती जागा मिळाल्या याचा दावा केला नाही. त्यामुळे काही जागांबाबत संभ्रम आहे. जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२३ कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील एकुण २५ ग्रामपंचायतीपैकी सहा ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. त्यामुळे १९ ग्रामपंचायती व २५ जागेवर पोटनिवडणुकीसाठी रविवारी (दि. पाच) ५४ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी ८१.३७ टक्के मतदान झाले. सोमवारी (दि.सहा) सकाळी दहा वाजता मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली आणि जवळपास दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण झाली. नायगाव तालुक्यातील लालवंडी ग्रामपंचायतीत नऊ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या गटाने सरपंचासह आठ जागेवर विजय मिळवत एकतर्फी सत्ता हस्तगत केली आहे. चुरशीच्या निवडणुकीत त्यांनी ग्रामपंचायत ताब्यात घेतली. यावेळी नोटाला ४१ मते पडली आहेत. अर्धापूर, तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीचा कौल काँग्रेसच्या बाजुने लागला आहे. देगलूर तालुक्यातील मरतोळी ग्रामपंचायत प्रथमच गावकऱ्यांनी नव तरुणांच्या हाती सोपवली आहे. तर गोगला गोविंद तांडा येथेही बदल झाला असून थेट बीआरएसप्रणित सरपंचासह सात पैकी चार जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. हदगाव तालुक्यातील लोहा आणि गवतवाडी येथे काँग्रेसप्रणित तर तळ्याची वाडी येथे संमीश्र यश आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यात काँग्रेसने यश मिळवले आहे. नायगाव तालुक्यात एका ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आ
No comments:
Post a Comment