व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Sunday, 1 October 2023

मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही - मनोज जरांगे


 मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही - मनोज जरांगे

अर्धापूर, दि.१ (वार्ताहर)- मराठा समाजाने मराठा आंदोलनात ला गालबोट लागेल असे कुठलेही वर्तन करू नये. शांततेच्या मार्गानेच आरक्षणाची लढाई लढावी.मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे सरकारला यापासून सुटका नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. अर्धापूर शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या १४ दिवसापासून सुरू करण्यात आलेल्या साखळी उपोषण स्थळी दि.१ ऑक्टोबर रोजी रविवारी सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीस अभिवादन करून जिजाऊ वंदनेने आयोजित सभेला सुरुवात करण्यात आली. त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा मराठा समाज बांधवाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जेसीबी मशीनने पुष्प वर्षाव करत ढोल ताशांच्या गजरात मनोज जरांगे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले की, मराठा समाजाने अशीच एकजूट यापुढेही कायम ठेवावी. मी महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. आपल्यात एकजूट होणे गरजेचे आहे. ही एकजूट १४ ऑक्टोबर रोजी आयोजित अंतरवाली सराटी येथील सभेत सरकारला दाखवायची आहे. मराठा समाजाचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठीच हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले. कायदेशीर लढाईच्या नावाखाली आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न होता कामा नये महाराष्ट्र दौऱ्याच्या संवाद यात्रेत कितीही गर्दी जमा झाली तरी अजिबात यात्रेला गालबोट लागता कामा नये. अशांतता पसरवू नका. या लढ्याचा ऐतिहासिक विजय जवळ आला आहे. विजय नक्कीच होणार आहे. हा विजय मराठ्यांचा असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वच मराठ्यांना शासनाने आरक्षण दिल्याशिवाय हा लढा थांबणार नाही. असे प्रतिपादन आयोजित सभेला जरांगे यांनी केले. राष्ट्रगीताने आयोजित सभेची सांगता झाली. यावेळी मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तालुक्यातील अनेक गावांतील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनासह मराठा कमांडो यांनी नियोजन बद्ध नियोजनात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment