व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Saturday, 7 October 2023

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गत 24 तासात 165 रुग्ण बरे होऊन परतले घरी

 63 रुग्णांवर शस्त्रक्रिया 


▪️857 रुग्णांवर उपचार 

▪️रुग्णालयामध्ये भरती रुग्ण 726


नांदेड, (जिमाका) दि. 7 :- येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकुण 857 रुग्णांनी ओपीडीमध्ये उपचार घेतला. सद्यस्थितीत 726  रुग्ण रुग्णालयामध्ये भरती आहेत. मागील 24 तासात म्हणजेच दि. 5 ऑक्टोंबर ते 6 ऑक्टोंबरच्या मध्यरात्रीपर्यंत एकुण 184 नवीन रुग्णांची भरती झालेली आहे. या 24 तासात 165 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या कालावधीत 6 अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात 1 नवजात बालक (स्त्री जातीचे ) व बालक 1 (पुरुष जातीचे) व प्रौढ 4 (पुरुष जातीचे 2, स्त्री जातीचे 2) यांचा समावेश आहे. 


वर नमूद 24 तासात एकूण 63  शस्त्रक्रिया झाल्या. यात 42 रुग्णांवर मोठ्या शस्त्रक्रिया तर 21  रुग्णांवर लहान शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मागील 24 तासात 23 प्रसुती करण्यात आल्या. यात 6 सीझर होत्या तर 17 नॉर्मल प्रसुती झाल्या अशी माहिती वैद्यकिय अधिक्षक डॉ. गणेश मनुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. 

No comments:

Post a Comment