नांदेड : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश विसर्जनानिमित्त शिवसेना सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीने सांगवी प्रभाग क्रमांक ३ आसना टी पॉइंट येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन दत्ता पाटील कोकाटे यांनी केले आहे.
दरवर्षी गणेश विसर्जनानिमित्त शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मागील वीस वर्षापासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो . हजारो भाविक भक्त या महाप्रसादाचा लाभ घेत असतात. याही वर्षी दिनांक 28 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सांगवी प्रभाग क्रमांक तीन मधील आसना टी पॉइंट येथे भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश भक्तांनी श्रीं विसर्जन सोहळा उत्साहात मात्र काळजीपूर्वक आणि शांततेत पार पाडावा असे आवाहनही सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केले आहे.यावेळी शिवसेनेतील अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार असल्याचेही कोकाटे यांनी कळवले आहे.महाप्रसादाचा जास्तीत जास्त भाविक भक्तांना लाभ घ्यावा असे आवाहन माजी नगरसेविका नागाबाई भुजंग कोकाटे आणि सह संपर्कप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी केले आहे.
...............
कृपया वरील बातमी प्रकाशित करून सहकार्य करावे.
No comments:
Post a Comment