नांदेड- तरोडा बुजुर्क मधील प्रगती नगर च्या एकता गणेश मंडळातर्फे आज दि २४ सप्टेंबर रोज रविवारी भव्य रक्तदान व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
रक्तदान हे श्रेष्ठदान आहे,या राष्ट्रिय कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे महाप्रसादाचा भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एकता गणेश मंडळाचे अध्यक्ष पंकज मुंडे,संस्थापक अध्यक्ष राजू भाई परदेशी,बंडूभाऊ देशमुख,अशोक भाऊ दांडगे,धनंजय उमरीकर यांनी केले आहे.
भव्य रक्तदान सकाळी ९ पासून सुरु होणार असून व महाप्रसादाचे आयोजन दुपारी १२ वाजल्याच्या नंतर करण्यात आले आहे. तरोडा भागात सर्वात मोठी गणेश मूर्ती एकता गणेश मंडळाने स्थापन केली आहे. विविध सामाजिक उपक्रम या मंडळातर्फे राबविले जातात. आ बालाजी कल्याणकर,नांदेड महापालिकेचे उपआयुक्त गिरीश कदम,नानक साई फाऊंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे,मंगेश कदम,माजी कार्यकरी जल अभियंते प्रल्हादराव भालेराव,संजय जैस्वाल यांनी भेट देऊन मंडळाच्या कार्याची प्रशंशा केली. आ बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. तरोडा भागात सर्वात मोठी गणेश मूर्ती एकता गणेश मंडळाने स्थापन केली असल्याने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे.
भूषण म्हेत्रे, राकेश नागुला, कपिल थोंटे, शक्ति सुवर्णकार, सुवर्णकार, आकाश लांबगे, गणेश देशमुख पुष्कर देशमुख बंडू देशमुख,ओम उमरीकर,दिनेश उमरीकर,जफर खान भागवत क़दम हे गणेश उत्सव साजरा करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
No comments:
Post a Comment