व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 28 September 2023

सच्चा कार्यकर्त्याच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन

सच्चा कार्यकर्त्याच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन
...........................
कोणताही प्रामाणिक कार्यकर्ता चळवळीत काम करतांना घरादाराची किंबहुना आपल्या शरीराचीही तमा करत नाही. अंगात रग व डोक्यात चळवळीची धग असते म्हणून तो समाजावरील अन्याय, अत्याचारा विरुद्ध जीवाच्या आकांताने लढत असतो. वेळेवर जेवण नाही. झोप नाही. सारखी भटकंती या सर्व प्रक्रियेत शारीरिकरीत्या तो पार खंगुन जातो. परंतु डोक्यात चळवळीची नशा असल्यामुळे त्याचे स्वतःसाठी व कुटुंबासाठी कमवायचे वयही झर्रकन निघून जाते. समाजाच्या प्रश्ना बरोबर त्याच्या कुटुंबाची जबाबदारी वाढायला लागते. हातात रुपया नसतो तर गाठीलाही दमडी रहात नाही. अशा परिस्थितीत त्याच्यावर जर काही संकट ओढावले तर तो हतबल होऊन जातो व चौहुकडून अडचणीत सापडतो. परिस्थितीमुळे त्याला आपला जीवनात खूप संघर्षाला सामोरे जावे लागते हे वास्तव आहे. अशीच काहीशी वेळ नांदेड मधील जिगरबाज आंबेडकरी कार्यकर्ता मनोज वाघमारे यांच्यावर आली आहे. ज्यांनी आयुष्यभर महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू राजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विचाराचा बाणा जोपासत  स्वाभिमानाने चळवळीत योगदान दिले आहे. अशा सामाजिक चळवळीत समर्पित योगदान देणाऱ्या मनोज वाघमारे यांच्यार आलेली ही वेळ कोणाही कार्यकर्त्यावर येऊ नये . दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा तीव्र  झटका आला. तात्काळ त्यांना नांदेड मधील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. ज्यात त्यांच्या हृदयाच्या शिरांमध्ये ब्लॉकेज निष्पन्न झाले आहेत. ऑपरेशनचा मोठा खर्च आहे, परंतु त्यांची आर्थिक स्थिती हलाकीची असल्यामुळे पुढील उपचार साठी त्यांना मदतीची आवश्यकता आहे.
आंबेडकरी चळवळीत सातत्याने योगदान देणाऱ्या या कार्यकर्त्याला समाजातील जाणकार समाजशील कार्यकर्त्यांनी आपल्या परीने जमेल तशी मदत करावी ही विनंती.
Lokesh kashinath kamble 
A/C Number:- 20286418807
IFSC CODE:- SBIN0016667

Gpay / PhonePay no.  8888914284 
(Lokesh Kamble)

.

No comments:

Post a Comment