नांदेड, (जिमाका)
:- मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा प्रशासन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात नांदेड शहरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांच्या विद्याथ्यामार्फत सादरीकरण करण्यात येणार आहे. या सादरीकरणात भाग घेण्यासाठी इच्छुक महाविद्यालयांनी सोमवार 11 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 वा. ललित व प्रयोगजीवी कला संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठ, नांदेड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (सामान्य) नांदेड यांनी केले आहे.

मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या सादरीकरणासाठी कला प्रकार, कालावधी, कलावंत संख्या पुढीलप्रमाणे आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी महाविद्यालयांनी ललित व प्रयोगजीवी कला संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील समन्वयक डॉ. अनुराधा पत्की यांचा दूरध्वनी क्रमांक 7057344411 यांच्याशी संपर्क साधावा. यामध्ये सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य ते मानधन देण्यात येणार आहे असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
00000
.jpg)
No comments:
Post a Comment