व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 1 May 2019

WhatsApp मुळे संपत आहे का तुमचं फोन स्टोअरेज; त्यासाठी करा 'हे' उपाय फोन स्टोअरेज संपू नये म्हणून सेंटिंगमध्ये करा 'हे' बदल



WhatsApp हे एक असं अॅप आहे ज्या माध्यमातून सर्वात जास्त मीडिया फाइल्स शेयर केल्या जातात. फोटो, व्हिडिओ आणि ऑडियो स्वरूपातल्या या फाइल्समुळे फोनचं स्टोअरेज मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. अशात जर तुम्ही ऑटोमॅटीक डाउनलोड ऑप्शन ON ठेवलं असेल, तर तुमच्या फोनची मेमरी लगेच फूल होते. अशावेळेस काय करायला हवं याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.
सेंटिंगमध्ये करा 'हा' बदल - तुमच्या मोबाईलमध्ये WhatsAppवर येणारी प्रत्येक मीडिया फाइल ऑटोमॅटिक डाउनलोड होत असेल तर ती तुमच्यासाठी सर्वात मोठी डोकोदुखी ठरते. त्यासाठी तुम्हाला सेटिंग्समध्ये काही म्यॅन्युअली बदल करावे लागतील. ज्यामुळे आलेल्या प्रत्येक मीडिया फाईलपैकी तुम्हाला नेमकी कोणती डाउनलोड करायची आहे हे ठरवता येतं.
अँड्रॉइड मोबाईलवर असं करा बंद - जर तुम्ही अँड्रॉइड मोबाईलवर WhatsApp वापरत असाल, तर ऑटोमॅटिक डाउनलोड बंद करण्यासाठी सर्वप्रथम 'Settings' मध्ये जाऊन 'Media auto-download' वर क्लिक करा. त्यानंतर 'When using mobile data' वर क्लिक करा. त्यानंतर photos, audio आणि videos चे सर्व बॉक्स अनचेक करा यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक डाउनलोड बंद होईल. Wi-Fi ऑन असताना आणि तुम्ही roaming मध्ये असतानासाठीसुद्धा यात ऑटोमॅटिक डाउनलोड करण्याचं ऑप्शन दिलं आहे. ते सुद्धा तुम्हाला वरच्याप्रमाणेच बंद करता येईल.
iOS मोबाईलवर असं करा बंद - जर तुम्ही iOS म्हणजेच iPhone वापरत असाल तर WhatsAppच्या Settings मध्ये जाऊन Data and Storage Usage वर क्लिक करा. त्यानंतर फोटो, व्हिडियो आणि ऑडियो या सर्व गोष्टी ऑटोमॅटिक डाउनलोड करण्यासाठी Never या ऑप्शनवर क्लिक करा. यामुळे iOS मोबाईलवरील ऑटोमेटिक डाउनलोड डिसेबल होतं आणि त्यामुळे तुमच्या iPhoneचं स्टोअरेजी बचत होते.

No comments:

Post a Comment