व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 9 May 2019

जय 'मल्हार'... दादर चौपाटीवरचा १००० टन कचरा हटवणाऱ्या मराठमोळ्या तरुणाचा UN कडून सन्मान




अनेकदा आपण वेगळं काहीतरी करण्याच्या विचारता आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्षं करतो. अनेकदा तर आपण आपली कर्तव्यही विसरून जातो. पण आपल्यापैकीच काही माणसं अशी असतात ज्यांना आपल्या कर्तव्याचं भान असतं आणि यातूनचं ते आपला वेगळा मार्ग निवडतात

 असचं काहीसं वेगळं पण समाजाशी बांधिलकी असणारं काम मुंबईमध्ये राहणाऱ्या 21 वर्षांच्या एका मुलाने केलं आहे. त्याच्या या कामाची दखल थेट संयुक्त राष्ट्रांनी घेतली असून त्याला UN तर्फे 'V अवॉर्ड'ने सन्मानित करण्यात आले आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, या मुलाने नक्की कोणतं कर्तव्य बजावलं आहे... आणि असं केलयं तरी काय? 
मुंबईत  राहणाऱ्या 21 वर्षीय तरूणाने  'दादर बीच' (Dadar Beach) वरून तब्बल एक हजार टन कचरा गोळा केला आहे. त्याच्या याच कारनाम्यामुळे त्याला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. छोट्याशा वयामध्ये एवढा मोठा कारनामा करणाऱ्या या तरूणाचं नाव मल्हार कलाम्बे असं आहे. खरं तर ही गोष्ट आताची नाही तर जवळपास दोन वर्षांपूर्वीची आहे. मुंबईतील गजबजलेल्या परिसरात राहणाऱ्या मल्हारने आपल्या मित्रांना एकत्र करून Dadar Beach वर जाऊन तेथील कचरा एकत्र केला. हा कचरा तुम्हा आम्हा सारख्याच लोकांनी समुद्रामध्ये टाकलेला होता. त्यानंतर या कामासाठी मल्हारने 'Beach Please' नावाच्या एका संस्थेची स्थापना केली आणि येथूनच सुरू झाली मल्हारच्या या आगळ्यावेगळ्या कर्तव्यपूर्तीची वाटचाल. संस्था स्थापन केल्यानंतर या संस्थेमार्फत साप्ताहिक स्वच्छता अभियान राबवण्यास त्याने सुरुवात केली. 
Malhar Kalambe
on Saturday
It's beautiful, magical, natural, incredible and it's unbelievable that WE POLLUTE IT! We need to love the Earth as we would love ourselves.
मल्हारने याबाबत बोलताना सांगितले की, तो जन्मापासून मुंबईमध्ये राहत आहे. दादरलाच असल्यामुळे त्याचं दादर चौपाटीवर येणं-जाणं असयाचंच. अशातच एक दिवस त्याला आधीची दादर चौपाटी आणि नंतरच्या दादर चौपाटीच्या भयंकर रूपाची जाणीव झाली.  मल्हार आवर्जुन सांगतो की, आपण ज्या शहरात राहतो, त्याला घडवण्याची आणि बिघडवण्याची शक्ती आपल्या म्हणजेच मानवाच्या हातात असते. त्यासाठी आपण प्रत्येकवेळी सरकारी अधिकाऱ्यांना दोष देऊ शकत नाही. 

No comments:

Post a Comment