नवी दिल्ली 22 एप्रिल : भाजपला लोकांच्या मुद्यांवर नाही तर भावनिक मुद्यांवर निवडणूक लढवायची आहे. शेतकरी, कामगार, छोटे व्यापारी, बेरोजगार हे भाजपच्या अजेंड्यावरचे मुद्दे नाहीत. तर त्यांना हिंदू, मुस्लिम, आणि पाकिस्तान यासारख्या विषयांवर प्रचार न्यायचा आहे असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी व्यक्त केलं. खऱ्या मुद्यांपेक्षा भावनिक मुद्यांवर निवडणूक लढवणं सोपं असतं त्यातून मत मिळवता येतात असंही ते म्हणाले.
प्रचार रुळावरून घसरला?
लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पूर्ण झाले असून मंगळवारी तीसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. आत्तापर्यंत झालेल्या प्रचारावर बोलताना यादव म्हणाले, भारताच्या हवाई हल्ल्यानंतर प्रचाराची गाडी पूर्णपणे रुळावरून घसरली. भाजपला आणि सरकारलाही तेच पाहिजे होतं कारण खऱ्या मुद्यांवरून सरकारला लक्ष विचलित करायचे होते त्यात त्यांना यश आल्याचं दिसतेय.

No comments:
Post a Comment