बीजिंग - चीनला चक्क चंद्रावर कापूसचे बी अंकुरित करण्यात यश आले आहे. चीनने नुकतेच आपले रोव्हर चांग-ई-4 चंद्रावर पाठवले. त्याच्याच माध्यमातून हा विक्रम करण्यात आला आहे. चंद्रावर कुठल्याही प्रकारचे बी अंकुरित करणे किंवा उगवण्याची ही मानवी इतिहासातील पहिलीच वेळ आहे. चीनच्या खगोलशास्त्रज्ञांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. कापसाच्या यशानंतर आता चीन चंद्रावर बटाटे उगवण्याचा प्रयोग करणार आहे.
डब्यात उगवले कापसाच्या रोपटे
चोंगकिंग विद्यापीठातील अॅडव्हांस्ड टेक्नोलॉजी रिसर्च इंस्टिट्यूटने फोटोंची एक मालिका जारी केली. त्यानुसार, हे बी एका डब्यातील जाळीमध्ये अंकुरित करण्यात आले आहे. या प्रयोगाच्या डिझाईनचे मुख्य संशोधक शाय गेंगशिन यांनी सांगितल्याप्रमाणे, चंद्रावर जाऊन एक बी अंकुरित करणे आणि रोपटे उगवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बटाट्याचे बी सुद्धा पाठवले...
चोंगकिंग विद्यापीठातील संशोधकांनी सांगितल्याप्रमाणे, पाणी आणि मातीने भरलेला एक डबा पाठवण्यात आला होता. हा डबा 18 सेंटीमीटर आकाराचा आहे. यात कापूस, बटाटे आणि मोहरीच्या बियांसह फळांवर बसणाऱ्या माशांची अंडी पाठवण्यात आली आहेत. अंतराळयानातून पाठवलेल्या छायाचित्रांमध्ये यापैकी कापूसच्या बियांना अंकुर फुटल्याचे दिसून आले आहे. ही प्रक्रिया पुढे कितपत यशस्वी ठरेल हे अद्याप सांगता येणार नाही.

No comments:
Post a Comment