व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 31 December 2018

गुजरातमध्ये हनुमानाच्या मूर्तीला सांता क्लॉजचे कपडे घातल्याने वाद, पुजारी म्हणाले, उबदार असल्याने घातले



गुजरातमध्ये हनुमान मंदिरात मूर्तीला सांता क्लॉजचे कपडे घातल्याने वाद निर्माण झाला आहे. बोटाद जिल्ह्यातील सारंगपूर मंदिरात दिवसात दोन वेळा देवाच्या श्रीविग्रहाचे वस्त्र बदलण्याची परंपरा आहे. त्यामध्ये रविवारी हनुमानाला सॅन्टाचे कपडे घालण्यात आले आहेत. मंदिराचे मुख्य पुजारी विवेक सागर यांनी त्यावर काहीच आक्षेप नसल्याचे सांगितले. हे कपडे अमेरिकेत राहणारे भाविक धमर भाई यांनी पाठवले आहेत असेही ते म्हणाले. परंतु, विविध हिंदुत्ववादी संघटनांनी या कपड्यांचा तीव्र विरोध केला आहे.

पुराजी विवेक सागर यांनी सांगितल्याप्रमाणे, "सध्या धर्नुमास सुरू आहे. परंपरेनुसार देवाला रोज दोन वेळा वेग-वेगळे कपडे घातले जातात. मुळात गोष्टीवर वाद होणे चुकीचे आहे. हे कपडे उबदार आणि मऊ आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये देवाला अर्पित करण्यात आले आहेत." मंदिरात हनुमानाला लाल रंगाची टोपी आणि पोशाख घालण्यात आला आहे. टोपीच्या किनाऱ्यांवर पांढऱ्या रंगाची उबदार लेस आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या कपड्यांचा तीव्र विरोध केला. हे बदलून हनुमानाला ताबडतोब दुसरे कपडे घालण्यात यावे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.

No comments:

Post a Comment