व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 26 September 2018

येवला तालुक्यातील मानोरी गावातील जवानाचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.आत्महत्या नसून घातपात असल्याचा कुटुंबियांनचा संशय


येवला तालुक्यातील मानोरी गावातील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके यांनी रविवारी पहाटे गोळी झाडून आत्महत्या केल्याची बातमी संबंधित अधिकाऱ्यांनी शेळके यांच्या कुटुंबियांना दिली असता .मात्र कुटुंबियांनी दिगंबर असे करूच शकत नसून हि आत्महत्या नसून  घातपात असल्याचा आरोप करत पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला. शेळके कुटुंबीयांनी घातपाताचा संशय असल्याचा आरोप  करत थेट गृहमंत्री, मुख्यमंत्री व संबधीतांना पत्र पाठवून याप्रकाराची चौकशी करण्याची व दिगंबर यांना शहीद घोषित करण्याची मागणी केली. शहीद घोषित करण्याची मागणी करत मुखेड फाट्यावर नाशिक औरंगाबाद महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यांच्या मृत्यूची चौकशी केली जाणार असून त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप नसल्याची माहिती आसाम येथील तेजपूरचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी पत्रात केला उल्लेख केल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी  त्यांच्या नातेवाईकांना आलेल्या पत्रातील माहिती दिली. आसाम येथील तेजपूर च्या अधिकाऱ्यांनी लेखी पत्र दिल्यानंतर नातेवाईकांनी  पार्थिव ताब्यात घेतल्या नंतर सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला. यावेळी मानोरी गावातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. शेळके यांच्या मृतदेहाला मुलगा हर्षल याने मुखअग्नी दिला. यावेळी सीआरपीएफच्या पथकाने मानवंदना दिली. शोकाकुल वातवरणात जवान  दिगंबर शेळके यांचा अंत्यविधी पार पडला

No comments:

Post a Comment