ऑनलाईन फॉमसी विरोधात ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशने शुक्रवारी एक दिवसीय बंद पुकारला आहे. यामुळे उद्या देशभरातील औषध दुकाने २४ तासांसाठी बंद राहणार आहेत. आज गुरुवारी मध्यरात्री पासून ते उद्या २८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत हा बंद राहणार आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
औषधांच्या ऑनलाईन विक्रीला जोरदार विरोध होत आहे. ई- फार्मसीमुळे (ऑनलाईन सेल ऑफ मेडिसीन) तरुण पिढी व्यसनाधिनतेकडे वळण्याचा धोका आहे. तसेच याचा समाजावर परिणाम होईल. यासाठी ऑनलाईन फार्मसीला केंद्र सरकारने परवानगी दिल्यास फार्मसीमध्ये औषधे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना त्याचा फटका बसणार आहे, असे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने म्हटले आहे.
उद्याच्या बंद दरम्यान दिल्लीसह देशातील अनेक भागात निदर्शने होणार आहेत.

No comments:
Post a Comment