व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Sunday, 2 September 2018

शिवा संघटना विद्यार्थी आघाडी जिल्हा शाखेचा विस्तार व मार्गदर्शन सोहळा


प्रतिनिधी/ २ सप्टेबर
नांदेड : शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना अंतर्गत शिवा विद्यार्थी आघाडीच्यावतीने  २ सप्टेंबर रोजी पदाधिकाNयांची निवड व मार्गदर्शन सोहळा व्हीआयपी विश्रामगृह नांदेड येथे अतिशय थाटामाटात संपन्न झाला.
या सोहळ्या प्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा संपर्वâ प्रमुख इंजि.अनिल माळगे व प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवा संघटनेचे जिल्हा प्रमुख संभाजी पाटील बुढ्ढे, प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थी आघाडीचे जिल्हा प्रमुख शुभम घोडके यांच्यासमवेत शहर प्रमुख विद्यार्थी आघाडी राहुल पाटील ममदापूरकर यांची उपस्थिती होती. यावेळी शिवा कर्मचारी महासंघाचे उपजिल्हा प्रमुख शरद हांद्रे, शहर प्रमुुख शिवराज उमाटे, संतोष पाटील यांची उपस्थिती होती.
यावेळी उपस्थितांना वरील मान्यवरांनी संघटनेनी केलेल्या २२ वर्षातील कार्याचा आढावा घेण्यात आला. त्याचप्रमाणे सामाजिक बांधीलकीतून संघटनेनी केलेली वाटचाल याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच भविष्यातील  संघटनेची दिशा व वाटचाल याबद्दलची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. व संघटनेत सर्व तरूण बांधवांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपल्या कार्याची प्रचिती दाखवावी असेही आवाहन करण्यात आले.
यावेळी विविध पदाधिकाNयांची निवड करण्यात आली. या निवडीमध्ये विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रसिध्दी प्रमुखपदी शिवा सावरगावे, लोहा तालुका प्रमुखपदी शुभम पोशट, हदगाव तालुका प्रमुखपदी शिवानंद स्वामी, दक्षिण शहर प्रमुख अमित शेट्ये, संपर्वâ प्रमुख मुखेडr शिवशंकर नंदगावकर, धर्माबाद तालुका संघटक साईनाथ स्वामी आदींची निवड यावेळी करण्यात आली. शिवा संघटनेच्या विस्तार व  मार्गदर्शन सोहळ्यास येथील तमाम तरूणांचा उत्स्पुâर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमाचे संचलन संतोष साखरे तर आभार चव्रेâश बन्नाळीकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment