व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 19 September 2018

.डॉ.महेश पेटेवार यांच्या संकल्पनेतुन ग्रामीण महाविद्यालयात प्राणीशास्त्र असोशिएशनची स्थापना



मुखेड (वार्ताहार) -  ग्रामीण महाविद्यालय  वसंतनगर येथील प्राणीशास्त्र विभागा मार्फत विविध उपकृम राबवले जातात त्याचाच एक भाग म्हणून उपकृमशिल प्राचार्य डॉ.हरिदास राठोड सर व  प्रा.डॉ.महेश पेटेवार यांच्या संकल्पनेतुन उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रीनिवास पवार यांच्या प्रेरणेने महाविद्यालयात प्राणीशास्त्र असोशिएशनची स्थापना करण्यात आली. त्यात अध्यक्ष कु.शितल पवार, उपाध्यक्ष पवन सुर्यवंशी, सचिव कु.शुभांगी सोनकांबळे, कोष्याध्यक्ष अंकुश पांचाळ, प्रसिद्धी प्रमुख मनिष जेधे तर कु.रुक्मिणी पंदिलवाड, अविनाश राठोड, कु.कविता जेधे, जावेद कासार, कु.राजनंदिनी जोंधळे व सचिन चव्हाण यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
                      कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ.महेश पेंटेवार यांनी केले तर अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे म्हणाले की प्राणीशास्त्रामुळेच आपण कोणाशी कसे वागले पाहिजे याचा अभ्यास होतो.लुप्त होत चाललेले  प्राणी व वनस्पतींची जपवणूक करुण जैवविविधता जपली पाहिजे.आजच्या वैज्ञानिक युगात वावरताना माणुस यंत्रा सारखा राबतोय. सॉफ्टवेअरच्या नादात निसर्गाकडे दुर्लक्ष करत आहे. जर जैवविविधता टिकवायची असेल तर वृक्ष लागवड व त्याचे संगोपन केल्यासच प्राण्यांना रहायला जागा, अन्न मिळू शकेल आपण आपल्या प्राणीशास्त्र असोशिएशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवावेत व समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण करावा.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कु.कविता जेधे तर आभार अविनाश राठोड यांनी मानले.संघटनेतील नुतन कार्यकारीनीस संस्थेचे अध्यक्ष कर्मवीर किशन राठोड, सचिव प्राचार्य गंगाधर राठोड,आ.डॉ.तुषार राठोड, प्राचार्य हरीदास राठोड, उपप्राचार्य अरुणकुमार थोरवे व विज्ञान विभागाचे समन्वयक प्रा.देविदास पवार यांनी अभिनंदन केले व भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.  

No comments:

Post a Comment