नांदेड (प्रतिनिधी)- गुंडेगाव ता. नांदेड येथील तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रतिष्ठित नागरिक जगदेवराव हंबर्डे यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासराव हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जगदेवराव हंबर्डे यांचे नाव अध्यक्षपदासाठी सर्वानुमते निश्चित करण्यात आले. यावेळी गोविंदराव कुरे, भगवानराव हंबर्डे, बाबुराव हंबर्डे, दिगांबर हंबर्डे, किशनराव हंबर्डे, पिंटू पाटील, देवराव हंबर्डे, माधवराव मालीपाटील, नंदिराम भांगे, सतिश भांगे, गणेश हंबर्डे, अशोक हंबर्डे, शिवहार हंबर्डे, दत्तराम हंबर्डे, गंगाधर वाघमारे, ग्रामसेविका तसेच विस्तार अधिकारी बच्चेवार यांच्यासह गावातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment