व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 30 July 2018

मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुण पडला पाया



30 जुलै : पुण्यात चाकण परिसरात मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त जमावाने 100 हुन अधिक गाड्यांची तोडफोड केली. या संतप्त जमावात विश्वास नांगरे पाटील थेट आंदोलनात घुसले. आंदोलनात जाऊन त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला आणि शांत राहण्याचं आवाहन केलं. यावेळी मराठा तरुणाने विश्वास नांगरे पाटील यांच्या पाया पडला

पुण्यात चाकण परिसरात आंदोलकांनी जबरदस्त तोडफोड केली आहे. तब्बल 100 ते 150 गाड्या आंदोलकांनी फोडल्या आहे.  चाकण जवळच्या तळेगाव चौकात आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी दिसेल त्या गाड्या पेटवून दिल्या आहे. यात मोठ्या प्रमाणात खासगी गाड्यांचा समावेश आहे. तर एसटी बसेसलाही आंदोलकांनी आग लावली आहे. काही बसेस तर जळून खाक झाल्या आहेत. खेड, चाकण आणि एमआयडीसी परिसरातील आंदोलकांनी हे तीव्र आंदोलन केलं आहे. चाकण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलीये.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतलीये. सर्व आमदारांनी सामूहिक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. तसंच काँग्रेसचे आमदार राज्यपाल यांच्या भेट घेण्यासाठी गेले आहे. मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे आमदार विशेष अधिवेशनाची मागणी करणार आहे. याआधीही काँग्रेसचे आमदार पंढरपूर-मंगळवेढाचे काँग्रेसचे आमदार भारत तुकाराम भालके यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिलाय.

No comments:

Post a Comment