वॉशिंग्टन-खेळण्या-बागडण्याच्या वयात भारतीय वंशाच्या एका अमेरिकन मुलाने अभियांत्रिकीची पदवी मिळवल्यानंतर पीएचडी सुरू केली आहे. १५ वर्षीय तनिष्क अब्राहम याने डेव्हिस येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून बायोमेडिकलमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून आता त्याने पीएचडीसाठी प्रवेश घेतला आहे.
माध्यमांशी बोलताना तनिष्क अब्राहम म्हणाला, 'मी खूप खुश आणि उत्साहित आहे. मला माझ्या यशाचा अभिमान आहे.' भारतातील केरळचे मूळ रहिवासी असलेले तनिष्कचे आई-वडील ताजी आणि बिजोऊ अब्राहम म्हणाले की, 'तनिष्कला अभ्यास खूप आवडतो. आम्हीही त्याला सर्वतोपरी मदत करतो.' तनिष्कने एक उपकरण डिझाइन केले आहे, त्याच्या मदतीने आगीत भाजलेल्या रुग्णांना स्पर्श न करताच हृदयाचे ठोके मोजता येतात. त्याला कर्करोगाच्या रुग्णांवरील उपचारासाठीही काही नवे करायचे असून तो या दिशेने काम करत आहे.
सॅक्रामेंटो येथील रहिवासी असलेल्या तनिष्क अब्राहमने २०१५ मध्ये वयाच्या ११ व्या वर्षी गणित, विज्ञान आणि फॉरेन लँग्वेज स्टडीजमध्ये पदवी मिळवली होती

No comments:
Post a Comment