व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 30 July 2018

शिवसेनेची बैठक संपली, मराठा आरक्षणासाठी शिवसेना भाजपसोबत! बैठकीत मराठा आरक्षणासाठी शिवसेना भाजपसोबत राहणार असल्याचे निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.


मुंबई, ता. 30 जुलै : मराठा आरक्षणाबाबत आज उद्धव ठाकरेंनी दुपारी १२ वाजता मातोश्रीवर बैठक बोलावली होती. गृहराज्यमंत्री आणि सेनेचे कोकणातले नेते दीपक केसरकर यांच्यासह सेनेचे सर्व आमदार या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर दुपारी ४ वाजता सेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ सोडविण्यासंदर्भातले निवेदन दिले. बैठकीत मराठा आरक्षणासाठी शिवसेना भाजपसोबत राहणार असल्याचे निर्णय झाला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
मराठा आरक्षणाबाबत सेनेनं नेमकी काय भूमिका घ्यावी, यावर या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर बैठकीला उपस्थित सेनेच्या सर्व आमदारांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा तात्काळ मार्गी लावण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली. कुठल्याही अहवालाची वाट न बघता, विशेष अधिवेशन बोलवावे असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
इतर समाजाला दिलेल्या आरक्षणातून एक टक्काही कमी न करता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. यावेळी उपस्थित सेनेच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तातडीने निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment