व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 14 March 2018

भाजपला आणखी एक मोठा धक्का, या पक्षाने सोडली भाजपची साथ



नवी दिल्ली : बुधवारचा दिवस भारतीय जनता पक्षासाठी अशुभ ठरला आहे. यूपी, बिहार पोटनिवडणुकीत पराभवानंतर आता भाजपला आणखी एक धक्का बसला आहे.

भाजपला मोठा धक्का

दक्षिणेत आपलं वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न करत असलेल्या भाजपला आणखी केरळमध्ये धक्का बसला आहे. केरळमधील भाजपचा एकमेव मित्रपक्ष भारतीय धर्म जन सेना(बीडीजेएस)ने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. टीडीपीने याआधी भाजपची साथ सोडली आहे. त्यानंतर बिहारमधील नेते जितंनराम मांझी यांनी देखील एनडीएला रामराम केला. 

भाजपवर नाराज

बीडीजेएस प्रमुख वेल्लापल्ली नटेसन हे भाजपवर नाराज होते. केंद्र सरकारकडे त्यांनी काही मागण्या केल्या होत्या. पण त्या मागण्या पूर्ण न झाल्याने त्यांनी एनडीएची साथ सोडली आहे. 2015 मध्ये भारतीय धर्म जन सेनेची स्थापना झाली होती. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत हात मिळवणी करत एनडीएमध्ये सहभागी झाले होते.

निवडणुकीआधी झटका

केरळमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे याआधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. डाव्यांना पराभूत करण्यासाठी भाजपने यांचा हात पकडला होता पण त्याआधीच त्यांना मोठा धक्का बसला आहे.

शिवसेना काय करणार?

शिवसेना आणि भाजप यांच्यात देखील अनेक गोष्टींवर खटके उडत आहेत. शिवसेना भाजपवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. त्यामुळे आता ३ पक्ष भाजपमधून बाहेर पडल्यानंतर शिवसेना काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल

No comments:

Post a Comment