19 फेब्रुवारी: तुम्हाला बीफ खायचं असेल तर खा त्याचा उत्सव कशाला करता असं वक्तव्य उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते मुंबईमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.
बीफ खाण्याबद्दल बोलताना ते म्हणाले तुम्हाला बीफ खायचं असेल तर खा पण त्याचा उत्सव का साजरा करताय? तोच प्रश्न त्यांनी चुंबनाबद्दलही विचारला. तुम्हाला चुंबन करायचं असेल तर करा पण त्याचे उत्सव कशाला साजरे करत आहात? तसंच या साऱ्याचा परामर्श घेत त्यांनी अफजल गुरूवरही टीका केली आहे. ज्या माणसाने संसदेवर हल्ला केला त्या अफजल गुरूची नावं घेणारी लोकंही आपल्याकडे आहेत.
या साऱ्यातून देशातील सगळ्या परिस्थितीवर प्रकाश त्यांनी टाकला. तसंच काही दिवसांपूर्वी आपल्या एका भाषणात त्यांनी धर्म आणि राजकारण एकत्र नको तर वेगळे हवे असं वक्तव्यही केलं होतं
व्यंकय्या नायडूंच्या या वक्तव्यातून त्यांनी त्यांच्या वैचारिक विरोधकांवर टीकाच केली आहे. त्यामुळे ते काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

No comments:
Post a Comment