नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० करोड रुपयांचा घोटाळा करून पसार झालाय. विजय माल्या एसबीआयसमवेत इतर बँकांचे ८००० करोड रुपये घेऊन पळाला. विक्रम कोठारीलाही कर्ज देऊन अनेक बँका फसल्यात... ही काही उदाहरण आहेत जे आत्तापर्यंत समोर आलेत. परंतु, देशाला खुळखुळा बनवणाऱ्यांमध्ये तब्बल ९३३९ कर्जदारांचा समावेश आहे. या लोकांनी भारतीय बँकांचे तब्बल १ लाख ११ हजार ७३८ करोड रुपये जाणूनबुजून रखडवलेत.
नवी दिल्ली : नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकेत ११,५०० करोड रुपयांचा घोटाळा करून पसार झालाय. विजय माल्या एसबीआयसमवेत इतर बँकांचे ८००० करोड रुपये घेऊन पळाला. विक्रम कोठारीलाही कर्ज देऊन अनेक बँका फसल्यात... ही काही उदाहरण आहेत जे आत्तापर्यंत समोर आलेत. परंतु, देशाला खुळखुळा बनवणाऱ्यांमध्ये तब्बल ९३३९ कर्जदारांचा समावेश आहे. या लोकांनी भारतीय बँकांचे तब्बल १ लाख ११ हजार ७३८ करोड रुपये जाणूनबुजून रखडवलेत.
विविध बँकांनी कर्जाच्या स्वरुपात दिलेली ही रक्कम आहे. कर्जाची ही रक्कम ज्या ९३३९ कर्जदारांनी घेतलीय ते हे कर्ज फेडू शकतात... परंतु, ते हे जाणूनबुजून टाळत आहेत. अशा लोकांना 'विलफुल डिफॉल्टर' म्हटलं जातं.
सरकारी बँकाही अडकल्या
क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड (सीआयबीआयएल) कडून मिळालेल्या डाटानुसार, कर्जाचा या आकड्यात सरकारी बँकांचे ९३,३५७ करोड रुपये अडकलेत. २०१३ साली ही रक्कम २५,४१० करोड रुपये होती. म्हणजेच गेल्या पाच वर्षांत यामध्ये तब्बल ३४० टक्के वाढ झालीय.
कर्जदारांचे नाव गुलदस्तात
इंडियन एक्सप्रेसच्या एका अहवालानुसार, आरबीआयनं आत्तापर्यंत सर्व कर्जदारांच्या नावांची यादी जाहीर केलेली नाही. गेल्या वर्षी आरबीआयनं सुप्रीम कोर्टात म्हटल्याप्रमाणे, कर्जदात्यांच्या नावाची लिस्ट सार्वजनिक करणं योग्य ठरणार नाही. यामध्ये सरकारी बँकांकडून ५०० करोड रुपयांहून अधिक कर्ज घेतलेलं आहे.

No comments:
Post a Comment