व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 19 February 2018

सुदृढ आरोग्यासाठी सायकल चालवा: डबेवाले



मुंबई : 

चाकरमान्यांना वेळेवर त्यांचा डबा पोहोचवणारे आणि जगात मॅनेजमेंटचे गुरू म्हणून स्थान असणारे मुंबईचे डबेवाले आता पर्यावरण संरक्षणाच्या मुद्द्यावर पुढे सरसावलेत. रविवारी पहाटे जुहू चौपाटी सर्कलपासून ते यारी रोडपर्यंत सायकल रॅली काढून वाढत्या प्रदूषणावर मात करणं गरजेचं असल्याचा संदेश त्यांनी दिला. या रॅलीत मुंबईतील २० डबेवाल्यांसह सायकलप्रेमी, ज्येष्ठ नागरिक यांनीही आवर्जून सहभाग नोंदवला.

पर्यावरण रक्षणासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी नियमित सायकलिंग करणं लाभदायक आहे असा संदेश मुंबईच्या डबेवाल्यांनी दिला. यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुंबई डबेवाले असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितलं की, 'हवेतील प्रदूषणात औद्योगिकीकरणाबरोबरच स्वयंचलित वाहनांचा सर्वात मोठा वाटा आहे. या वाहनांमध्ये इंधनाचा वापर होत असल्यानं शरीरासाठी घातक असणारे नायट्रोजन, सल्फर, कार्बन डायऑक्साईड यांसारखे घातक वायू हवेत मिसळतात. यामुळे श्वसनाची समस्या, दमा, ब्राँकायटीस, रक्तातील ऑक्सिजन वहनाची क्षमता कमी होणं, डोळ्यांची जळजळ, दृष्टी कमी होणे, वारंवार खोकला होणं आणि बधिरपणा येणं अशा समस्या उद्भवतात. म्हणूनच इंधनाचा वापर कमी प्रमाणात करा, जेणेकरून प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा संदेश डबेवाल्यांनी दिला. 

पर्यावरण संवर्धनासाठी लोकांमध्ये सायकल संस्कृती रुजावी हाही उद्देश या सायकल रॅलीमागे असल्याचं तळेकर यांनी सांगितलं. डबेवाले सायकलचा वापर करून चाकरमान्यांना वेळेत डबे पोहोचवतात. सायकल या वाहतुकीच्या साधनामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत नाही. म्हणूनच पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत डबेवाल्यांनी ही सायकल रॅली काढली होती. 

No comments:

Post a Comment