नवी दिल्ली – राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराविषयी केलेल्या वक्तवाचा बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. भागवत यांना आपल्या स्वंयसेवकांवर एवढाच भरवसा असेल तर त्यांनी सरकारी खर्चावर कमांडो सुरक्षा का घेतली असल्याचा सवाल विचारला आहे.
सध्या विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना भारतीय लष्कराला करावा लागत आहे. जवानांचे मानसिक खच्चीकरण करण्यासारखे भागवतांचे हे वक्तव्य आहे. त्यांना अशा प्रकारचे वक्तव्य करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या. आपल्या स्वंयसेवकांवर एवढा भरवसा विश्वास असेल तर मोहन भागवत यांनी सरकारी खर्चावर त्यांनी विशेष कमांडो आपल्या सुरक्षेसाठी का ठेवले आहेत, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यासाठी संपूर्ण देशाची भागवतांनी माफी मागावी. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आता सामाजिक संघटना राहिली नसून तिचे राजकीय संघटनेत रूपांतर झाले आहे. सामाजिक सेवेकडे त्यांचे स्वंयसेवक दुर्लक्ष करून पूर्णपणे भाजपसाठी निवडणुकीचे राजकारण करण्यात व्यस्त असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

No comments:
Post a Comment