व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 9 February 2018

कृ.उ.बा.च्या तज्ञ संचालकपदी देविदास सुडके यांची नियुक्ती जिल्हा निबंधकाचे लेखी आदेश प्राप्त



मुखेड  प्रतिनिधी : - मुखेड कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विशेष निमंत्रित तज्ञ संचालक म्हणून भाजपाच्या किसान आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुडके यांची नियुक्ती झाल्याचे लेखी आदेश जिल्हा निबंधकाच्या स्वाक्षरीने दि. 08 फेब्राुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या दरम्यान प्राप्त झाले आहे. 
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन विकास व विनिमय अधिनियम 1963 च्या कलम 13 (1-सी ) मधील तरदतुदीप्रमाणे 5 कोटी किंवा त्यापेक्षाही अधिक आर्थिक उत्पन्न असलेल्या राज्यातील कृषि बाजार समित्यावर 4 तज्ञ संचालकाची विशेष निमंत्रित तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येते तसेच 5 कोटी पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कृषि उत्पन्न बाजास समितीच्या संचालक मंडळावर देखील 2 तज्ञ संचालक मंडळाची विशेष निमंत्रित तज्ञ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येते. त्याच अनुषंगाने देविदास सुडके यांची भाजपाचे जिल्हा सरचिटणिस माधवअण्णा साठे यांच्या अथक प्रयत्नामुळे सुडके यांची नियुक्ती झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस, सहकार मंत्री सुभाष देशमुख, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्या सहकार्याने माधवअण्णा साठे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. देविदास सुडके यांच्या नियुक्तीचे लेखी आदेश मंत्रालय कक्ष अधिकारी जयंत भोईवार यांच्या स्वाक्षरीने जिल्हा निबंधकांना प्राप्त झाले आहे.
देविदास सुडके यांच्या नियुक्तीचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, आमदार डॉ. तुषार राठोड, भाजपा जिल्हा सरचिटणिस माधवअण्णा साठे, गंगाधर राठोड, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, बळवंत पाटील बेटमोगरेकर, खुशालराव पाटील उमरदरीकर, बालाजी पाटील, अंबुलगेकर, अविनाशराव घाटे, व्यंकटराव पाटील चांडोळकर, नामदेव पाटील जाहुरकर,प्रा. विनोद आडेपवार, गंगाधर पाटील केरुरकर ,संजय वाघमारे, शिवाजी पा कार्लेकर, मारोती आमनर, संगमेश्वर देवकत्ते, किशोरसिंह चौहाण ,गंगाधर पाटील जांभळीकर,महेश मुक्कावार, शिवाजी खतगांवकर, विश्वनाथ लोखंडे, नजीर शेख, मुजीब सौदागर, अशोक गजलवाड, विनोद चौधरी, अनिल पईतवार, वैजनाथ दमकोंडवार, डॉ. माधव उच्चेकर, डॉ. विरभद्र हिमगिरे,ज्ञानेश्वर डोईजड, सुभाष सुभेदार, शंकर नाईनवाड, नामदेव यलकटवार , पांडुरंग निरर्णे ,विठ्ठल हिवराळे, संदिपभाऊ पोफळे आदींनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment