व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 5 February 2018

लेंडी धरणग्रस्तांची फसवणूक केली गुन्हे दाखल करा धरणग्रस्तांची मागणी

मुक्रमाबाद.प्रतिनिधी दि.2 मुक्रमाबाद येथील लेंडी प्रकल्पासाठी एकुण 1310 घरांचा निवाडा सन 2015 मध्ये मंजूर करण्यात आलेला मावेजा प्रकल्प ग्रस्ताना एक वर्षाच्या आत देणे बंधनकारक असताना देखील अध्याप मावेजा वितरीत करण्यात आले नसल्याने व प्रकल्पग्रस्तांच्या घराच्या संपादनाची प्रक्रिया झाली नसल्याने या सर्व प्रकरणास जिल्हाधिकारी (नांदेड)भुसंपादन अधिकारी,व कार्यकारी अभियंता देगलुर यांच्या विरूद्ध 420 प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करा अशी मागणी समस्त धरणग्रस्तानी केली आहे.व वेळोवेळी विविध प्रकारचे आंदोलन करुन देखील शासन धरणग्रस्तांची फसवणूक शिवाय दुसरे काहीही करु शकले नाही 1310 घरांचा मावेजा एकाच वेळेस देण्यात यावे,आमच्या या मागाण्या पुर्ण झालेल्या आवस्थेत दिसुन आल्या नाहीत त्यामुळे सदरील मागण्यासाठि 12 फेब्रुवारी सोमवारी रोजी मुक्रमाबाद बसस्थानकावर रास्ता रोको व बेमुदत बाजारपेठ बंद ठेवणार असल्याचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरिष महाजन(जलसंपदा मंत्री)विभागीय आयुक्त औरंगाबाद,मुख्य कार्यकारी अभियंता औरंगाबाद,यांना दिले आहे,या निवेदनावर शिवराजअप्पा आवडके,सुभाषअप्पा बोधने,राजेश्वरराव देशमुख,डॉ.एस.आर.नाईक,गौसखाँ पठाण,सहित समस्त धरणग्रस्तांचे स्वाक्षरी आहेत. मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद पासुन जवळच असलेल्या गोणेगाव येथे लेंडी नदीवर 1984 मध्ये लेंडी धरणाच्या कामाला सुरुवात झाली या धरणात मुक्रमाबाद येथील 1310 घरे संपादित करण्यात आली आहेत.शासनाने या घराचा मावेजा देण्यासाठी तीन वेळा अंतिम निवाडा मंजूर केला निवाडा मंजूर करण्यात आला त्या वेळापासुन प्रकल्पग्रस्ताना मिळणाऱ्या रक्कमेवरील व्याज बंद करण्यात आले निवाडा मंजूर झाल्यानंतर प्रकल्पग्रस्ताना एका वर्षात व्याजासह रक्कम देणे अपेक्षित आहे.पण साडेतीन वर्षे होऊनही मावेजा मिळाला नाही.मावेजा व पुर्नवसनासाठी अनेकवेळा निवेदने व आंदोलन करण्यात आली पण शासणाकडुन व प्रशासनाकडुन काहीच मिळाले नाही जर एक हजार तीनशे दहा घरांचा मावेजा शासनाला एकदाच देता येत नसेल तर टप्प्याटप्याने एक-एक वार्ड वाईज वाटप करावे अशी मागाणी धरणग्रस्त करित आहे

No comments:

Post a Comment