व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 9 February 2018

अबब! चोरट्यांनी न्यायालयात केली चोरी; स्ट्राँग रुममधून चोरीच्या सोन्यावर डल्ला



चोरी करण्यासाठी चोरट्यांची नजर कुठे पडेल याचे काही सांगता येत नाही. कितीही कडक सुरक्षा व्यवस्था असली तरी त्यांची चोरी करण्याची इच्छा काही कमी होत नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे, ज्या न्यायालयात गुन्हेगारांच्या शिक्षेचा फैसला केला जातो. त्याच न्यायालयात चोरट्यांनी मोठा डल्ला मारल्याचा खळबळजनक प्रकार बीडमध्ये घडला आहे.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयातील स्ट्राँग रूम फोडून चोरट्यांनी सोने चोरुन नेले आहे. खिडकीचे गज कापून चोरट्यांनी खोलीत प्रवेश केला आणि स्ट्राँग रुममधील सोने लंपास केले. या प्रकारामुळे न्यायालयेही सुरक्षित नसल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अंबेजोगाई शहरातील योगेश्‍वरी देवीच्या अंगावरील सोने चोरीला गेले होते. पोलिसांनी तपासादरम्यान हे सोने हस्तगत करुन ते न्यायालयाच्या स्ट्राँगरुममध्ये ठेवले होते. मात्र, या सोन्यावर आता पुन्हा एकदा चोरट्यांनीच डल्ला मारला आहे. चोरट्यांनी फोडलेल्या या स्ट्राँगरुममध्ये काही बँकेच्या एफडी, चेकबुक ही ठेवण्यात आले होते.

No comments:

Post a Comment