व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 11 January 2018

ह्युमनराईट उत्कृष्ठ पञकारिता पुरस्काराने भद्रे सन्मानित


मुखेड (प्रतिनिधी) 
जिल्हा पञकार संघ ,मीमांसा फाॅऊडेशन, ह्युमन राईट फाॅऊडेशन, दै. समिक्षा मंथन क्रिएटिव्ह ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित दर्पण दिनाच्या अनुषंगाने 5 जानेवारीच्या पुर्वसंध्येला नांदेड येथील सह्याद्री शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात पञकारीता पुरस्कार वितरण सोहळा  विविध व विशेष मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला .पञकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात दै. लोकपञ तालुका प्रतिनिधी तथा मुखेड तालुका पञकार संघाचे सचिव नवनाथ भद्रे यांना मिमांसा फाऊंडेशनचा ह्युमन राईट पञकारिता पुरस्कार नांदेड परिक्षेञ विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.  यावेळी माजी शिक्षणमंञी आ. डि. पी. सावंत, दै. समिक्षाचे मुख्य संपादक रूपेशजी पाडमुख, अरविंद जाधव, सखाराम कुलकर्णी,  डाॅ. सुनिल कदम, जय महाराष्ट्र चॅनल संपादक तुळशीदास भोईटे, जान्हवी मुळे, आय. बी. एन. लोकमतचे विशाल परदेशी,  दै.लोकपञ आवृत्ती प्रमुख डाॅ. गणेश जोशी, रामेश्वर धुमाळ, शिवहरी गाढे, ज्ञानोबा पवार, दिलीप माहोरे आदिंची उपस्थिती होती. नवनाथ भद्रे हे मागील पंधरा वर्षापासून पञकारिता क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरित आहेत भद्रे यांना यापुर्वी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव पुरस्कार प्राप्त तर सामाजिक संस्थेच्या कार्यात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट जिल्हा युवा पुरस्कार जिल्हाधिकारी नांदेड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असुन ते एन.जी.ओ.चे ग्रामीण विकास कार्यकर्ता परीषद महाराष्ट्र समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत यासह संस्थेच्या माध्यमातून जमिन अधिकार, अन्न अधिकार, महिला सक्षमिकरण, लिंग-भेद, बेटी बचाव बेटी पढाव आदि प्रश्नांवर  उत्कृष्ठ कार्य करीत आहेत. भद्रे यांना पञकारिता पुरस्कार मिळाल्याबद्ल माजी. आ. किशनराव राठोड, आ.डाॅ. तुषारजी राठोड, माजी. आ. हणमंतराव पा. बेटमोगरेकर, मुखेड भुषण डाॅ. दिलीप पुंडे, डाॅ. अशोक कौरवार, डाॅ. हिमगीरे, प्राचार्य मनोहर तोटरे, प्रा.संजिव डोईबळे, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार आ. सुभाष साबणे, पद्मशाली समाज संघटना जिल्हाध्यक्ष व भाजपा जिल्हा सरचिटणिस, माधव अण्णा साठे, पो. निरीक्षक संजय चौबे, रिपाई जिल्हाध्यक्ष गौतम काळे, जि.प.सदस्य संतोष राठोड, जि.प.सदस्य पेठवडज प्रकाश उलगुलवाड,पं.स.सदस्य व्यंकटराव पा. दबडे, सरपंच संजयसिंग देवकत्ते, ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव अंबुलगेकर, राहुलजी लोहबंदे,  मुखेड तालुका पञकार संघाचे तालुकाध्यक्ष व तथा लोकसंकेतचे संपादक नामदेव यलकटवार, मराठी बायबोली परीषदेचे अध्यक्ष डाॅ. रामकृष्ण बदने, प्रा.यशवंत बोडके, काॅग्रेसचे नंदकुमार मडगुलवार, डाॅ. श्रावण रॅपनवाड, चंद्रकांत गायकवाड, प्रकाश पवार, एनजीओ जिल्हाध्यक्ष शिवाजी पवार, निती निकेतन संस्था मुख्याध्यापक अनिलजी कोल्हे, दिलीप देवकांबळे, संस्थापक माधव राठोड, सुरेश गवळे यांच्यासह तालुक्यातील विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पञकार आदिंनी त्यांचे अभिनंदन केले. 

No comments:

Post a Comment