बीड- राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या साधेपणाचे अनेक किस्से नेहमीच त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितले जात असतात. बीडकरांनीही नुकताच सुप्रिया यांचा हा साधेपणा अनुभवला. पुढच्या कार्यक्रमाला उशीर होऊ नये म्हणून सुप्रियांनी हातात भाकरी घेत वाहनाकडे जात असतानाही 'सेल्फी' घेऊ इच्छिणार्या कार्यकर्त्यांना नाराज न करता त्यांनी हातात भाकरी असूनही त्यांनी कार्यकर्त्यांसोबत 'सेल्फी' घेण्यास वेळ दिला. आता हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
त्याचे झाले असे, शनिवारी (ता.20) बीडमध्ये आठव्या लेखिका साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुप्रिया सुळेंच्या हस्ते झाले. कार्यक्रम संपवून त्यांना माजलगावच्या कार्यक्रमास जायचे होते. संमेलनाच्या उद्घाटनानंतर काही कार्यकर्त्यांशी त्यांनी शासकीय विश्रामगृहावर चर्चा केली व भेटण्यसाठी आलेल्या कार्यकर्त्यांशी संवादही साधला. यात बराच वेळ गेला त्यामुळे माजलगावच्या कार्यक्रमासाठी उशीर होत असल्याने त्यांनी निघण्याची तयारी केली मात्र सकाळपासून उपाशी असलेल्या सुप्रियांनी जेवण करूनच पुढे जावे असा आग्रह करत स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचे ताटही तयार केले मात्र कार्यकर्त्यांची गर्दी काही कमी होईना शेवटी सुप्रियांनीच टिशू पेपरवर ताटतल्या भाकरी व त्यावर भाजी घेत गाडीकडे त्या निघाल्या परंतु, त्यांच्यासोबत 'सेल्फी' घेण्यासाठी इच्छुक काही कार्यकर्ते विश्रामगृहाबाहेर थांबले होते. ताई जाणार आणि आपल्याला त्यांच्यासोबत 'सेल्फी' मिळणार नाही अशीच मानसिकता त्यांची झाली होती. मात्र, हातात भाकरी घेऊन सुप्रयांनी 'सेल्फी'ला वेळ दिला. बीड माजलगाव प्रवासात त्यांनी बीडकरांची ही 'शिदोरी' खाल्ली. तेही फोनवरून मतदार संघातल्या समस्यांबाबत चर्चा करत

No comments:
Post a Comment