मुक्रामाबादः प्रतिनिधी दि.18
मुक्रामाबाद येथील रहिवासी व सध्या परभणी येथे जलसंपदा विभागात मृद शास्त्रज्ञ असलेले डाँ मेहराज अजिजसाब शेख यांची केंद्रीय लोकसेवा आयोगा तर्फे खुल्या प्रवर्गातुन साहयक आयुक्तपदी निवड करण्यात आली आहे.
मार्च !एप्रिल २०१७मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाने संपूर्ण भारतातुन खुल्या प्रवर्गातील दोन पदासाठी ३९५ उमेदवारांच्या आवेदनातुन २४उमेदवारांना चाळणीअंती मुलाखती साठी पाञ ठरविले होते .या दोन पदापैकी एका पदावर डाँ मेहराज शेख यांची निवड करण्यात आली.डॉ.मेहराज यांनी मागिल दहा वर्षात शासन सेवेत असताना शेतकरी हिताचे अनेक कामे केली राष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदातुन शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष भेटी घेत प्रक्षेञावर जाऊन त्यांना मार्गदर्शन केले.त्यांच्या या कार्याचे शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कौतुक ही केले. मुक्रामाबाद येथे सामान्य कुटूंबात जन्माला आलेल्या डाँ मेहाराजवर आजोबा महेबुसाब व काबाडकष्ट करणारे वडील अजीजसाब यांचा प्रभाव होता त्यांचे वडील मुक्रामाबाद जवळील लेंडी व तेरु या दोन्ही नदीतुन डोक्यावर घागर घेऊन दुध विकून डाँ मेहराज व कुटूंबाचे पालणपोषण केले .एकंदरच गरिबीत जीवण जगुन परिस्थितीची जाण ठेवुन डाँ मेहराज यांनी आपल शिक्षण पूर्ण केले त्यांच्या या यशाबदल मुखेडचे आ.डाँ तुषार राठोड .माजी सरपंच . आसफल्ली कोतवाल बंडेप्पा खंकरे गुरुजी.चाँदसाब शेख.गौससाब पठाण ग्रा.प सदस्य हेमंत खंकरे महेमुद कोतवाल .मन्सुर पठान. फेरोज पठाण संग्राम कल्पे .जलील पठान (पञकार)सोहेल शेख .जैनु हिंजीरे शुभम गंदलवाड आदीनी अभिनंदन केले आहे.

No comments:
Post a Comment