जयपूर
राजस्थानची सुवर्ण नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जैसलमेर येथे सध्या एका शाही लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबईतील उद्योगपती नरेंद्र मेहता यांचा मुलगा जय याच्या लग्न जैसलमेरला होत आहे. त्यासाठी चार चार्टर विमानातून ६०० पाहुणे येथे पोहचले असून वाळवंटातून त्यांना लग्नस्थळी आणण्यासाठी चक्क ट्रॅक्टरचीच ट्रेन बनवण्यात आली आहे.
थंडीच्या दिवसात राजस्थानमधील वातावरण आल्हाददायक असते. यामुळे मेहता यांनी जयचे लग्न शाहीपद्धतीने जैसलमेरमध्ये करण्याचा निर्णय घेतला. सर्व पाहुणे बाहेरुन येणार असल्याने त्यांना आणण्यासाठी चार चार्टर विमानांचा ताफाही तयार ठेवण्यात आला आहे. आतापर्यत या शाही लग्नसोहळ्यासाठी ६०० पाहुणे जैसलमेरला पोहचले आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी लग्नाच्या विधी ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे पाहुण्यांची ने आण करण्यासाठी लांबलचक अशी ट्रॅक्टरची ट्रेन बनवण्यात आली आहे. ट्रॅक्टरमधून पाहुण्यांना वाळवंटाची सफर अनुभवता यावी यासाठी ही तजवीज करण्यात आली आहे

No comments:
Post a Comment