व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Wednesday, 27 December 2017

पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी टोळी गजाआड आंध्र प्रदेश पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे



विजयवाडा : आंध्र प्रदेश पोलिसांनी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांच्या या कारवाईत ही टोळी एक Voip (voice internet protocol) एक्सचेंज चालवत असल्याचं उघड झालं असून, या टोळीकडून अनेक कंपन्यांचे सिमकार्ड आणि डिव्हायस जप्त केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच जम्मू-काश्मीरमधील मिलिट्री इंटेलिजेंसच्या एका यूनिटला या एक्सचेंजचा सुगावा लागला होता. या एक्सचेंजच्या माध्यमातून, लष्कराची माहिती मिळवण्यासाठी विविध नंबरवरुन कॉल केले जात होते.

लष्कराच्या सूचनेनंतर पोलिसांनी छापेमारी करुन, या टोळीचा पर्दाफाश केला. या छापेमारीत पोलिसांनी 6 Simbox, बेकायदेशीर पणे मिळवलेले 230 सिमकार्ड आणि लॅपटॉप आदीसह अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं जप्त केली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, या टोळीचे नेटवर्क तेलंगाणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकपर्यंत पसरलेलं आहे.

काय आहे Simbox एक्सचेंज?

या बॉक्सच्या माध्यमातून परदेशात बसलेली व्यक्ती आपला मोबाईल नंबर जाहीर न करता, भारतात कॉल करु शकते. हा कॉलदरम्यान ज्याला फोन केला आहे, त्या व्यक्तीच्या मोबाईलवर तो नंबर भारतीयच असल्याचं दाखवतं. त्यामुळे कॉल करणारा व्यक्ती परदेशातून फोन करत आहे, हे समोरच्या व्यक्तीला कळत नाही.

याच तंत्रज्ञानाचा फायदा घेत पाकिस्तानातील इंटेलीजेंस्ट ऑपरेटिव्ह संघटना भारतीय लष्कराची आणि सुरक्षा रक्षकांना कॉल करुन, माहिती गोळा करण्याचा प्रयत्न होत असे.

No comments:

Post a Comment