मुंबई- देशातील आघाडीचे उद्योगपती राहिलेले रतन टाटा आज 80 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला रतन टाटाशी संबंधित माहिती देणार आहोत. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला देशातील आघाडीचे उद्योगपती फावल्या वेळात काय करतात, याविषयी माहिती घेऊन आलो आहोत.
संपत्ती कमविणे आणि ती खर्च करणे दोन्हीही तशा अवघड गोष्टी. जेवढे कष्ट पैसा कमविण्यासाठी करतो, तितकेच कष्ट पैसा खर्च करण्यासाठी करावे लागतात, असे दिसून आले आहे. श्रीमंत लोकांकडे अमाप पैसा असतो, परंतु तो खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे मुळात वेळच नसतो. त्यामुळे ते या पैशाचे काय करतात, असे प्रश्न सर्वसामान्यांना पडत असतो. प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यात कोणी मोठा बंगला बांधतो, तर कोणी जगभरातील विविध लक्झरियस कार खरेदी करतो. काही उद्योगपती आयलॅंड खरेदी करतात तर काही क्रिकेट, बुटबॉल, रग्बी टीम तर काही एफ-1 टीम खरेदी करण्यावर पैसा खर्च करतात. पण रतन टाटा यांना लॉन्ग ड्राईव्हवर जायला आवडते.
रतन टाटांना लॉन्ग ड्राईव्हवर जायला आवडते-
रतन टाटा यांना लॉन्ग ड्राईव्हवर जाणे आवडते. त्यांच्याकडे माल्या यांच्याप्रमाणे लग्जरी कार्स खूप आहेत. याचबरोबर ते फावल्या वेळेत विमान उडविण्याचा छंद आहे. ते मुंबईत असताना आपल्या दोन कुत्र्यांसोबत मरीन ड्राईव्हवर फेरफटकाही मारतात.
पुढील स्लाईडवर वाचा,सध्याच्या घडीचे जगातील बडे उद्योगपती फावला वेळ कसा व्यथित करतात...
मुकेश अंबानी-
मुकेश अंबानींना पैशांची काहीच कमी नाही. मात्र, पैसे खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नाही. मुकेश अंबानी याचाच भाग म्हणून मुंबईत सर्वात मोठा बंगला 'एंटिलिया' बांधला आहे. त्यासाठी पाच हजार कोटी रूपये खर्च केले आहेत. याचबरोबर त्यांनी मुंबई इंडियन्स ही आयपीएलमधील टीमही खरेदी केली आहे. याचबरोबर ते आणि त्यांची पत्नी निता अंबानी यांनी स्थापन केलेल्या धीरूबाई अंबानी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमांतून गरजू लोकांना मदत करतात.
उल्लेखनीय म्हणजे मुकेश अंबानी फावल्या वेळात काय करत असतील असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. फावल्या वेळात मुकेश अंबनी पत्नी निता यांचा क्लासिकल डान्स पाहणे पसंत करतात. याचबरोबर ते वर्षातून एकदा- दोनदा ते आफ्रिका खंडातील देशात कुटुंबियांसोबत फिरायला जातात. आयपीएलच्या आपल्या टीमच्या मोजक्या सामन्यांनाही ते हजेरी लावतात.
उद्योगपती विजय माल्या म्हणजे एक लक्झरी लाईफस्टाईल जगणारे व्यक्तिमत्त्व. नाईट क्लब, पार्टीत विजय माल्या यांना वेळ घालवायला आवडते. अशाच पार्ट्यासाठी त्यांनी माल्यानी एक जहाज, आयलॅंड खरेदी केले आहे. याचबरोबर महागड्या कार्स गोळा करणे आवडते. आज त्यांच्याकडे जगातील सर्वोत्तम 100 पैक्षा जास्त कार्स आहेत. म्हैसूर येथे त्यांनी एक हॉर्स रायडिंग फार्महाऊस खरेदी केले आहे. जेव्हा-जेव्हा मिळेल तेव्हा ते तेथे घोड्यावर पैसे लावण्यासाठी जातात. त्यांनी एक-दोन वर्षापूर्वीच एफ-1 रेसिंग टीम खरेदी केली आहे.
मार्क झुकेरबर्ग-
फेसबुकचा मालक असलेला व चिरतरुण असलेल्या मार्कने आपल्या वेगळ्या अंदाजात एक शैक्षणिक फाऊंडेशन सुरु केले आहे. त्याने न्यू जर्सीतील नेवार्कमध्ये एक पब्लिक स्कूलला 100 मिलियन डॉलरची मदत दिली आहे. याचबरोबर तो शिक्षण आणि आरोग्यासाठी लोकांना मदत करणार आहे. त्याने नुकताच याबाबत गिव्हिंग प्लेज या संस्थेशी करार केला आहे.
बिल गेट्स -
हायटेक टॉयलेट बांधायचेय-
मायक्रोसॉफ्टचा संस्थापक बिल गेट्सने आरोग्य, शिक्षण, कृषी आणि इतर सामाजिक क्षेत्राला बिल आणि मेलिंडा गेट्स फाऊंडेशनच्या माध्यमांतून लाखो लोकांना मदत केली आहे. मात्र, बिल गेट्सना हायटेक टॉयलेट बांधायचे आहे. त्यांना अशा टॉयलेटचा शोध लावायचा आहे, संशोधन करायचे आहे जेथे तंत्रज्ञानाने मलनिस्सा:रण साफ करणे किंवा त्याची प्रोसेस करुन कसा वापर करता येईल त्याचा शोध लावणे.
कुमारमंगलम बिर्ला-
बिर्ला ग्रुपचे प्रमुख असलेल्या कुमारमंगलम बिर्ला यांना शुटिंगचा मोठा छंद आहे. आपल्या संपत्तीतील काही रक्कम ते यासाठी खर्च करतात. फावल्या वेळेत ते शुटिंग रेजवर निशाणा साधण्यात व्यस्त असतात.
लॅरी एलिसन-
संगणक प्रणाली ओरॅकलचे सहसंस्थापक आणि सीईओ असलेले लॅरी एलिसन भरपूर पैसे खर्च करीत असतात. अमेरिकेतील कप सेलबोट रेस सीरीजचे आयोजन असो, मालिबूतील बीचवर बिलियन डॉलरचे घर खरेदी करणे असो अथवा सस्टेनेबल लिव्हिंग लॅब बनवणे असो आणखी काही असो लॅरी एलिसन यांचे नाव आपोआपच तेथे जोडले जाते

No comments:
Post a Comment