व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Thursday, 7 December 2017

गुजरात निवडणूक- पहिल्या टप्प्याचा प्रचार थांबला; उद्या मतदान

ऑनलाईन । अहमदाबाद

पाटीदार पटेल समाजाचे आंदोलन, गुजरातचा विकास, मंदिर दर्शनाचे राजकारण आणि अनेक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी यामुळे टिपेला पोहचलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील प्रचार आज थांबला. पहिल्या टप्प्यातील ८९ मतदारसंघांमध्ये शनिवारी (दि. ९) मतदान होत असून पटेल समाज आणि व्यापारीवर्गाचे वर्चस्व असलेल्या सौराष्ट्र व दक्षिण गुजरातचा यात समावेश आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसाठी हा पहिला पेपर कठीण असल्याचे मानले जाते.
गेली २२ वर्षे गुजरातमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला दोन महिन्यांपूर्वी ही निवडणूक सोपी वाटत होती, मात्र पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराचा धडाका लावला आणि निवडणुकीत रंग भरला. काँग्रेसने हार्दिक पटेल यांच्यासह ओबीसी समाजाचे नेते अल्पेश ठाकोर, दलित नेते जिग्नेश मेवानी यांना सोबत घेऊन आघाडी उभारली. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदिवसाआड तीन-चार सभा घेतल्या. पंतप्रधानांच्या पहिल्या टप्प्यात तब्बल १४ सभा झाल्या आहेत. भाजपचे अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्र्यांची टीम प्रचारात उतरली. भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता पहिल्या टप्प्यातील ८९ मतदारसंघांत प्रचार संपला आहे. शनिवारी येथे मतदान होईल.
पहिल्या टप्प्यातील ठळक वैशिष्ट्य़े
गुजरात विधानसभेच्या १८२ पैकी ८९ मतदारसंघांमध्ये ९ डिसेंबरला मतदान. उर्वरित ९३ मतदारसंघांत १४ डिसेंबरला मतदान होऊन निकाल १८ ला लागणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानात मुख्यमंत्री विजय रूपानी, काँग्रेस नेते शक्तिसिंह गोहेल, परेश धनानी यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार. यावेळी परिस्थिती भाजपसाठी कठीण असल्याचा अंदाज आहे. गुजरातमध्ये पटेल समाजाची लोकसंख्या १७ टक्क्यांवर आहे. ४५ ते ५० मतदारसंघांवर पटेल समाजाचे वर्चस्व आहे.

No comments:

Post a Comment