कॅब सेवा पुरवणारी ‘ओला’ कंपनी ग्राहकांसाठी सायकल भाड्याने देण्याची सुविधा लवकरच सुरू करणार आहे. ओला आयआयटी कानपूर कॅम्पसमध्ये ‘ओला पेडल’ नावाने साइकल रेंटल सर्व्हिसची चाचणी सुरू आहे.
संपूर्ण कॅम्पसमध्ये ५०० ते ६०० सायकल उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यी ओला अॅपवरुन जसे कॅब बुक करतात तशाच प्रकारे सायकल देखील भाड्याने घेऊ शकत असल्याचे ‘ओला’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा प्रकल्प यशस्वी झाला तर येणाऱ्या काही महिन्यात ओला या सेवेत आणखी उत्तम बदल करुन ग्राहकांसाठी उपलब्ध करणार आहे. आजकाल, तरुण वर्गात सायकलविषयी अधिक जागरुकता, लोकप्रियता पाहायला मिळत आहे. परंतु ही सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहचण्यापूर्वी कानपूर कॅम्पसमध्ये सायकलची चाचणी करण्यात येणार आहे. कानपूर कॅम्पसमध्ये सध्या उपलब्ध करण्यात आलेल्या सायकलमध्ये चांगल्या दर्जाचे फिचर्स नाहीत, परंतु पुढील येणाऱ्या नव्या सायकलमध्ये क्यूआर कोड आणि जीपीएस ट्रॅकिंग सारख्या सुविधा करण्यात येणार आहेत.

No comments:
Post a Comment