व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Monday, 4 December 2017

…आणि नवरदेव पोहचला “हल्लाबोल” पदयात्रेत


आज चौथ्या दिवशी वर्धा जिल्हयातील भिडी गावातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल पदयात्रेला सुरुवात झाली.चौथ्या दिवशीही पदयात्रेमध्ये शेतकऱ्यांचा मोठा सहभाग होता.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल पदयात्रेमध्ये सहभागी होत आहेत.आज या पदयात्रेमध्ये मडकोना गावचा निलेश कोंढरे हा नवरदेव वराती आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल पदयात्रेमध्ये सहभागी झाला.यावेळी त्याने अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत सेल्फीही काढला. अजित पवार यांनी त्या नवरदेवाला आहेरही दिला. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी शेतकरी मोठया संख्येने सहभागी होत होते आणि आपल्या समस्या सांगत होते.
या पदयात्रेमध्ये विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे,माजी मंत्री जयंत पाटील,विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,माजी मंत्री गुलाबराव देवकर,माजी मंत्री अनिल देशमुख,आमदार विदया चव्हाण,राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,माजी आमदार संदीप बजोरिया,माजी आमदार सुरेश देशमुख,जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत,महिला जिल्हाध्यक्षा शरयू वांदिले,युवकचे प्रदेश उपाध्यक्ष समीर देशमुख,सुरेखा ठाकरे,यवतमाळ जिल्हाध्यक्षा क्रांती धोटे-राऊत,प्रवक्ते महेश तपासे, यवतमाळचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले,ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बालबुधे,आदींसह यवतमाळ,वर्धा जिल्हयातील पदाधिकारी,कार्यकर्ते,महिला कार्यकर्त्या मोठया संख्येने सहभागी झाले आहेत.

No comments:

Post a Comment