एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या दिल्लीतील घराबाहेर तरुणांनी भगवा फडकवला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. भगवा फडकावणारे तरुण राष्ट्र स्वाभिमान दलाचे असल्याचे म्हटले जाते आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तरुण भगवा झेंडा हातात घेऊन ‘वंदे मारतम’ आणि ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी करताना दिसत आहेत. त्यानंतर ओवैसीच्या घराबाहेर भगवा झेंडा फडकावतात आणि एक पोस्टर लटकावतात. या पोस्टरवर, ‘भगवा ए हिंद।’, असे शब्द लिहिलेले दिसून येतात.
काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये जाहीर सभेत ओवैसी यांनी हमारे हरे रंग के सामने कोई रंग नहीं टिकेगा; ना मोदी का रंग ना काँग्रेस का, किसी का रंग नही खाली हमारा रंग रहेगा’, असे विखारी वक्तव्य केले होते. ओवैसी यांच्या त्या वक्तव्याने भडकलेल्या राष्ट्र स्वाभिमान दलाच्या तरुणांनी त्यांच्या घराबाहेरच भगवा फडकवत हिंदुस्थान सुरुवातीपासून भगवा होता आणि भगवाच राहिल, असे म्हटले आहे
No comments:
Post a Comment