मुंबई
तेरा वर्षापूर्वी पतीची हत्या करुन त्याचा मृतदेह घरातल्या पाण्याच्या टाकीत पुरणाऱ्या एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. सदर विकृत महिला पतीला पुरलेल्या घरातच गेल्या १३ वर्षांपासून राहत होती. या महिलेला सोमवारी सेक्स रॅकेट चालवत असल्याप्रकरणी बोईसर पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी चौकशीदरम्यान तिने पतीची हत्या केल्याची देखील कबूली दिली आहे. पोलिसांनी तिच्या घराची टाकी खोदली असता तिथे तिच्या पतीचा सांगाडा पोलिसांना सापडला आहे.
सरिता भारती (३७) असे त्या महिलेचे नाव असून ती बोईसर येथील एका चाळीत सेक्स रॅकेट चालवायची. सोमवारी सरिताच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली व तिच्या सहीत चार वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना अटक केली. अटकेनंतर सरिताच्या चौकशीदरम्यान तिने १३ वर्षापूर्वी तिचा पती सहदेव भारती याची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. सहदेवला सरिताच्या वेश्याव्यवसायाविषयी समजल्यानंतर त्यांच्यात भांडण झाले होते. त्यानंतर सहदेव झोपलेला असताना सरिताना हतोडा त्याच्या डोक्यात मारून त्याची हत्या केली. त्यानंतर तीने घरातील पाण्याच्या टाकीखाली खड्डा करुन त्यात सहदेवचा मृतदेह गाडला. त्यानंतर ती याच घरात सेक्स रॅकेट चालवू लागली होती.
सदर महिलेच्या कबूलीनंतर पोलिसांनी तिच्या घरात खोदकाम केले त्यावेळी त्यांना सहदेवचा सांगाडाआढळून आला. पोलिसांनी तो मृतदेह प्रयोगशाळेत पाठविला असून सहदेवच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. तसेच भारतीने आणखी कुणाची हत्या केली आहे का? याबाबतही पोलीस तिची चौकशी करत आहेत

No comments:
Post a Comment