- मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजा तर्फे आज नांदेड बंदची हाक देण्यात आली होती. या आंदोलना दरम्यान भाग्यनगर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केला आहे. छत्रपती चौकात दुकानें बंद ठेवण्याचे आवाहन
करत असताना पोलिसांनी दोन मराठा आंदोलकांना मारहाण केली. शिवाय वाहने देखील जप्त करण्यात आल्याचा आरोपकरण्यात आला आहे. या मारहाणी नंतर मराठा आंदोलकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत ठिय्या आंदोलन केले. पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मराठा आंदोलकांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांची दखल घेऊन तात्काळ उपोषण सोडवणे बाबत. नांदेड जिल्हाधिकारी यांना मराठा आंदोलकाकडून निवेदन देण्यात आले
सात दिवसापासून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या न्यायिक मागण्यासाठी आमरण उपोषण करत आहेत, परंतु अद्यापही शासनाने त्याची दखल घेतली नसून सबब त्यांची तब्बेत अधिकाधिक खालावत चालली आहे म्हणून शासनाच्या या आडमुठे धोरणांच्या विरोधात आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने नांदेड शहरासह 16 ही तालुक्यात कडकडीत बंद पुकारून आल्या
समाजाच्या पुढील मागण्यांचा विचार करून तात्काळ मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत मागण्या मान्य कराव्या, जरांगे पाटलांचे उपोषण सोडवून सकल मराठा समाजाला न्याय द्यावा अशी विनंती.
मराठा अंदोलकानी केली आहे
सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी.हैद्राबाद सह सातारा,बाॅम्बे गव्हर्नमेंटचे गैझेट लागु करावे.
अंतरवाली सराटी सह संपुर्ण महाराष्ट्रातील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.
राज्यभरात कुणबी नोंदणी तपासुन, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचे काम हे अतिशय मंदगतीने चालु आहे त्याला गती देण्याचं काम शासकीय यंत्रणामार्फत करण्यात यावे.
ई.ड्ब्लु.एस.सह एस. ई.बी.सी. आणि कुणबी हे तिनही पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून द्यावेत.
१ जुन २००४ च्या कायद्यात सुधारणा करुन मराठा व कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय जारी करावा
मराठा आंदोलक आणि पोलिसांची बाचाबाची, मोर चौक येथे मराठा आंदोलकांना मारहाण, पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
--------------------------
Anchor - नांदेड बंद दरम्यान मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. दुकाने बंद करण्याचे आवाहन करताना पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने चार ते पाच जण जखमी झाले. जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज नांदेड बंद पुकारण्यात आलाय. नांदेड शहरातील शिवाजी पुतळा येथे सकल मराठा बांधव जमा झाले. दुकाने बंद करण्याचे आवाहन करत असताना राज कॉर्नर येथे मराठा आंदोलकांना अडवण्यात आले. या ठिकाणी पोलीस निरीक्षक शेंडगे यांनी आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. दुसरीकडे मोर चौक येथे दुकाने बंद करण्याचे आवाहन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये चार ते पाच मराठा आंदोलक जखमी झाले. पोलिसांनी विनाकारण लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचे कळल्यानंतर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकले. मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटमध्ये आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केले. लाठीचार्जुळे नांदेडमध्ये वातावरण तणावपूर्ण झाले होते.
No comments:
Post a Comment